आयपीएल २०२३पासून टीम इंडियाला युवराज सिंगसारखा खतरनाक पॉवर हिटर बॅट्समन मिळाला आहे. हा डॅशिंग क्रिकेटर मैदानावर इतका जीवघेणा आहे की तो आपल्या झंझावाती खेळाने भारताला जगातील सर्वोत्तम संघ बनवेल. या फलंदाजाचा लवकरच टीम इंडियात प्रवेश होऊ शकतो. आयपीएल २०२३ मध्ये या जबरदस्त फलंदाजाची धमाकेदार फलंदाजी पाहून बीसीसीआयचे सचिव जय शाहही खूश झाले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत “टीम इंडियाला तुझ्यासारख्या खेळाडूची गरज आहे”, असे म्हटले. “युवराज सिंगसारख्या धडाकेबाज फलंदाजाची संघाला गरज असून यशस्वी ती पूर्ण करणार”, असे काही चाहते म्हणत आहेत.

टीम इंडियात या युवराजसारख्या धडाकेबाज फलंदाजाची एन्ट्री होणार!

आयपीएल २०२३ मधून टीम इंडियाला असा फलंदाज मिळाला आहे, जो फलंदाजीच्या शैलीत काहीसा युवराज सिंगसारखा आहे. गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध या फलंदाजाने असे वादळ निर्माण केले की सगळेच त्याचे कौतुक करत आहेत. होय, आम्ही बोलत आहोत राजस्थान रॉयल्सचा झंझावाती फलंदाज यशस्वी जैस्वाल, ज्याने गुरुवारी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध १३ चेंडूत अर्धशतक झळकावून इतिहास रचला. याआधी आयपीएलमध्ये कोणत्याही फलंदाजाला एवढा वेगवान अर्धशतक ठोकता आलेले नाही. या सामन्यात यशस्वी जैस्वालने ४७ चेंडूत ९८ धावांची नाबाद खेळी खेळली.

Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Tilak Verma scores centuries in two consecutive T20 matches in South Africa
Tilak Varma : ‘…मी कल्पनाही केली नव्हती’, विक्रमी शतकानंतर तिलक वर्माने देवासह ‘या’ खेळाडूचे मानले आभार
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
KL Rahul Statement on Sanjiv Goenka Animated Chat in IPL 2024 loss Said Wasn’t the nicest thing Ahead
KL Rahul: “मैदानावर जे काही घडलं ते फार चांगलं…”, संजीव गोयंका भर मैदानात भडकल्याच्या घटनेवर केएल राहुलने पहिल्यांदाच केलं वक्तव्य
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
Shreyas Iyer Double Century After 9 year for Mumbai Scores Career Best First Class 233 Runs Innings Mumbai vs Odisha
Shreyas Iyer Double Century: २४ चौकार, ९ षटकार, २३३ धावा… श्रेयस अय्यरने वादळी खेळीसह मोडला स्वत:चाच मोठा विक्रम, IPL लिलावापूर्वी टी-२० अंदाजात केली फटकेबाजी

जय शाहच्या या ट्विटमधून मोठा इशारा मिळाला आहे

यशस्वी जैस्वालने या कालावधीत १३ चौकार आणि ५ षटकार मारले. यशस्वी जैस्वालचा फलंदाजीचा स्ट्राईक रेटही २०८.५१ आहे. यशस्वी जैस्वालची धमाकेदार खेळी पाहून बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट केले की, ‘यशस्वी जैस्वालची खास खेळी आणि आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक. त्याने आपल्या खेळाप्रती प्रचंड संयम आणि उत्कटता दाखवली. नवीन इतिहास घडवल्याबद्दल अभिनंदन. भविष्यातही तुझा हा उत्कृष्ट फॉर्म चालू राहो. टीम इंडियाला तुझ्यासारख्या खेळाडूची गरज आहे.”

यशस्वी जैस्वालने आयपीएलच्या चालू हंगामात आतापर्यंत १२ डावात ५७५ धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वालने या काळात ४ अर्धशतकं आणि १ शतक झळकावलं आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या ट्विटमध्ये यशस्वी जैस्वालच्या टीम इंडियात प्रवेशाचे संकेत मिळाले आहेत. त्याचवेळी टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, “यशस्वी जैस्वालवर टीम इंडियाकडून खेळण्याची वेळ आली आहे.”

हेही वाचा: IPL2023: राग आला अन् मध्यरात्री स्वतःच्या हातानेच केलं मुंडण, कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूला संघातून वगळले

भारत २०२३ विश्वचषक ट्रॉफी जिंकू शकतो

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या स्फोटक खेळीबद्दल यशस्वी जैस्वालचे कौतुक केले जात आहे. यशस्वी जैस्वाल ही युवराज सिंगसारखा आक्रमक आणि स्टायलिस्ट क्रिकेटर आहे. यशस्वी जैस्वालला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी दिल्यास ती यावर्षी २०२३चा वर्ल्ड कप ट्रॉफी भारताला जिंकून देऊ शकते. युवराज सिंगने २०११चा विश्वचषक भारताला जिंकून दिला होता आणि यशस्वी जैस्वालमध्येही तीच क्षमता आहे की तो २०२३चा विश्वचषक भारताला जिंकून देऊ शकतो.