मुंबई इंडियन्स संघाने कीरॉन पोलार्डला फलंदाजीत बढती द्यावी, अशी सतत मागणी होत असते. चेन्नईविरुद्धच्या लढतीत आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने पोलार्डला मोठी खेळी करण्याची संधी मिळाली आणि त्याने ५७ धावांची तुफानी खेळी करत या संधीचे सोने केले. मात्र फलंदाजीत बढती मिळावी अशी प्रत्यक्ष पोलार्डची मागणी नाही. परिस्थितीनुसार संघ निवडला जातो, अशी प्रतिक्रिया पोलार्डने व्यक्त केली.
मलाही कधीही बढती मिळावी असे वाटते. अन्य खेळाडूंचे मला माहीत नाही, परंतु खेळाडू म्हणून सर्वोत्तम कामगिरी करण्याची माझ्यावर जबाबदारी आहे. संघव्यवस्थापन माझ्यावर जी जबाबदारी सोपवेल ती पार पाडणे माझे कर्तव्य आहे. संधीचा अचूक फायदा उचलणे आवश्यक असल्याचेही त्याने सांगितले.
उन्मुक्त चंदला दंड
नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात गणवेशासंबंधीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सलामीवीर उन्मुक्त चंद याला दंड ठोठावण्यात आला. ‘‘शनिवारी झालेल्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात उन्मुक्त चंदने आयपीएलच्या आचारसंहितेतील गणवेशासंदर्भातील २.१.१ कलमाचे उल्लंघन केले आहे,’’ असे आयपीएलच्या पत्रकात म्हटले आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सला या सामन्यात पाच धावांनी पराभव पत्करावा लागला तरी उन्मुक्त चंदने १९ चेंडूत दोन चौकार आणि एक षटकारासह २३ धावांची खेळी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा