Hardik Pandya Shares Funny Video Of Natasha: इंडियन प्रीमियर लीग २०२३ (आयपीएल २०२३) मध्ये, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघाने चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी हा संघ पहिल्याच सत्रात चॅम्पियन ठरला होता. मागील वर्षी प्रमाणे यंदाही गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये पोहोचणार पहिला संघ ठरला आहे. त्यामुळे सध्या हार्दिक पांड्या आणि त्याचा संघ निवांत आहे. या दरम्यान, हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या संघात सामना होणार असल्याचे दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये प्रेझेंटर्स जतीन सप्रू, कृणाल पंड्या आणि इशान किशन देखील दिसत आहेत. टॉस दरम्यान नताशाकडून एक मोठी चूक होते. यानंतर हार्दिक पांड्या तिची खूप चेष्टा करतो. सगळे हसायला लागतात. नाणेफेकीसाठी हार्दिक पांड्या नाणे वर फेकतो, त्यावेळी नताशा हेड की टेल बोलायला विसरते. यानंतर हार्दिक पांड्या तिची मस्करी करतो. त्याचबरोबर तिची नक्कल करतानाही दिसतो.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य

नाणेफेक जिंकून नताशा प्रथम फलंदाजीचा निर्णय घेते –

त्यानंतर पुन्हा एकदा नाणेफेक होते. जेव्हा हार्दिक पांड्या नाणे फेकतो तेव्हा नताशा हेड बोलते आणि नाणेफेक जिंकते. यानंतर जतीन तिला विचारतो की तिला काय करायला आवडेल? ती प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेते. तिला कारण विचारल्यावर ती म्हणते की, खेळपट्टी खूप चांगली आहे. यानंतर सगळे पुन्हा हसायला लागतात. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – IND vs AUS: डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी बीसीसीआयने केली महत्त्वाची घोषणा, ‘या’ व्यक्तीवर सोपवली टीम इंडियाची मोठी जबाबदारी

गुजरातचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला –

आयपीएल २०२३ मध्ये, जिथे चेन्नई सुपर किंग्स (सीएसके), मुंबई इंडियन्स (एमआय) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) सारखे संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करत आहेत, तिथे गुजरात संघ आरामात प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. संघाचे १३ सामन्यांत १८ गुण आहेत. त्यामुळे अशा स्थितीत क्वालिफायर- १ खेळण्यासाठी गुजरातचा संघ सज्ज झाला आहे. दुसरा कोणताही संघ इतक्या गुणांपर्यंत पोहोचू शकत नाही.

Story img Loader