LSG vs PBKS Match Records: लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जचा ५६ धावांनी पराभव केला. लखनऊकडून मार्कस स्टॉइनिसने ५ षटकार आणि ६ चौकार मारले. त्याने ७२ धावांची शानदार खेळी केली. या सामन्यात अनेक विक्रम झाले. पंजाब आणि लखनऊच्या खेळाडूंनी वेगवान फलंदाजी करताना षटकार आणि चौकारांचा विक्रम केला. आयपीएलच्या इतिहासातील हा दुसरा सर्वाधिक धावसंख्येच सामना होता, ज्यामध्ये सर्वाधिक षटकार आणि चौकार मारले गेले.
लखनऊकडून दोन अर्धशतके झळकावण्यात आली. स्टॉइनिसने ७२ धावांची खेळी केली. तर सलामीवीर काइल मेयर्सने २४ चेंडूत ५४ धावा केल्या. त्याने ७ चौकार आणि ४ षटकार मारले. आयुष बडोनीने ४३ धावांची शानदार खेळी केली. त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले. तसेच पंजाबकडून अथर्व तायडेने अर्धशतक झळकावले. त्याने ३६ चेंडूत ६६ धावा केल्या. त्याने ८ चौकार आणि २ षटकार मारले. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ६७ वेळा चेंडू सीमापार टोलवला.
२०१० मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एका आयपीएल सामन्यात सर्वाधिक षटकार आणि चौकार मारले गेले होते. या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी ६९ चौकार आणि षटकार लगावले होते. यानंतर २०१८ मध्ये पंजाब आणि कोलकाता यांच्यात झालेल्या सामन्यात ६७ षटकार आणि चौकार मारले गेले होते. यापूर्वी २००८ मध्ये डेक्कन चार्जर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात ६५ षटकार आणि चौकार मारले होते.
आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या –
मोहालीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना २५७ धावा केल्या होत्या. आयपीएलच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २०१३ मध्ये पुण्याविरुद्ध २६३ धावा केल्या होत्या. आरसीबीने २०१६ मध्ये गुजरातविरुद्ध २४८ धावा केल्या होत्या.
आयपीएल सामन्यातील सर्वाधिक चौकार आणि षटकार –
६९ (३९, ३०) – चेन्नई विरुद्ध राजस्थान, चेन्नई, २०१०
६७ (४५, २२) – पंजाब विरुद्ध लखनऊ, मोहाली, २०२३
६७ (३६, ३१) – पंजाब विरुद्ध कोलकाता, इंदूर, २०१८
६५ (४२, २३) – डेक्कन चार्जर्स विरुद्ध राजस्थान, हैदराबाद, २००८