Rishabh Pant coming to watch the Gujarat Titans vs Delhi Capitals match:आयपीएल २०२३च्या सातव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले आहेत. हा सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या महत्त्वाच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या सामन्यात ऋषभ पंत स्वत: आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचला आहे. गेल्या वर्षी झालेल्या कार अपघातानंतर ऋषभ पंत पहिल्यांदाच स्टेडियममध्ये पोहोचला आहे.
ऋषभ पंत स्टेडियममध्ये पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो डगआउटमध्ये बसलेला दिसत आहे. आपल्या कारमध्ये स्टेडियम गाठले आणि क्रॅचच्या सहाय्याने स्टँड गाठले. त्याने पांढरा टी-शर्ट घातला आहे. त्याने गडद चष्माही घातला आहे.
गेल्या वर्षी पंतच्या गाडीला अपघात झाला होता –
गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस ऋषभ पंतची कार डिव्हायडरला धडकली होती. या अपघातात पंतच्या कारला आग लागली. पंत यातून बाहेर पडू शकले असले तरी. या अपघातानंतर पंतवर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत. त्याच्या पायामध्ये फ्रॅक्चर आहे. त्यामुळे पूर्णपणे सावरायला त्याला वेळ लागणार. यामुळे तो यंदाच्या आयपीएल हंगामात सामील होऊ शकला शकला नाही.
हेही वाचा – IPL 2023: इरफान पठाण आणि सुनील गावसकरांनी नाटू-नाटू गाण्यावर धरला ठेका; पाहा मजेदार VIDEO
सामन्याबद्दल बोलायचे, तर दिल्ली कॅपिटल्स संघाने १५ षटकांच्या समाप्तीनंतर ५ बाद १२१ धावा केल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर सरफराज खान २२ आणि अक्षर पटेल १६ धावांवर खेळत आहे. गुजरात संघाकडून मोहम्मद शमी आणि जोसेफने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर राशीद खानने एक विक घेतली आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मिचेल मार्श, रिले रुसो, सरफराज खान (विकेटकीपर), अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अमन हकीम खान, खलील अहमद, एनरिच नॉर्टजे.
गुजरात टायटन्स: रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल, अल्झारी जोसेफ.