Jersey number 18 is very special for Virat Kohli: आयपीएलच्या १६ व्या हंगामात विराट कोहलीचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. यंदाच्या हंगामात विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. आयपीएल व्यतिरिक्त विराट कोहलीने टीम इंडियासाठीही खूप धावा केल्या आहेत. मूळचा दिल्लीचा असलेला विराट कोहलीने दीर्घकाळ टीम इंडिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद भूषवले असले तरी या खेळाडूचा जर्सी क्रमांक एकच राहिला असून तो नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. आता माजी भारतीय कर्णधाराने आपल्या जर्सी १८ नंबरच्या जर्सीबद्दल अनेक खुलासे केले आहेत. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विराट कोहलीसाठी जर्सी नंबर १८ का आहे खास?

विराट कोहली म्हणाला की, “सुरुवातीला जर्सी क्रमांक १८ माझ्यासाठी फारसा महत्त्वाचा नव्हता. जेव्हा मी टीम इंडियासाठी अंडर-19 खेळायला सुरुवात केली. तेव्हा मला ही जर्सी मिळाली, पण नंतर ही जर्सी माझ्यासाठी खूप खास बनत गेली.” तो पुढे म्हणाला की, “माझे आंतरराष्ट्रीय पदार्पण १८ तारखेला झाले. याशिवाय माझ्या वडिलांच्या आठवणी १८ शी निगडित आहेत. १८ डिसेंबर २००६ रोजी माझ्या वडिलांचे निधन झाले. अशा प्रकारे, माझ्या आयुष्यातील दोन सर्वात संस्मरणीय दिवस १८ शी संबंधित आहेत.”

हेही वाचा – Virat Kohli: हैदराबादविरुद्ध तीनवेळा भोपळाही न फोडणारा कोहली आजच्या सामन्यात दाखवणार का कमाल? जाणून घ्या आकडेवारी

‘हा क्षण येईल असे कधी वाटले नव्हते, पण…’

विराट कोहली पुढे म्हणाला की, “१८ क्रमांकाची जर्सी घालणे ही माझ्यासाठी खास भावना आहे. मी मैदानावर १८ क्रमांकाची जर्सी घालून खेळतो. याशिवाय माझे हजारो चाहते १८ क्रमांकाची जर्सी घालून सामना पाहायला येतात, ही भावना खूप खास आहे… मात्र, असा क्षण येईल, एक दिवस असे घडेल, असे मला वाटले नव्हते. विशेषत: जेव्हा मी हे पाहतो, तेव्हा मला वाटते की देवाने मला सर्व काही दिले आहे. हे सर्व इतके सोपे नव्हते, परंतु सर्व देवाने दिले.” मात्र, विराट कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय चाहते सतत कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader