‘‘कोलकाता नाइट रायडर्सने गेल्या वर्षी आयपीएलच्या विजेतेपदाला गवसणी घातली होती. पण असे असले तरी त्याचे दडपण आमच्यावर नाही. भूतकाळाचे दडपण न घेता ही वेळ बिनधास्तपणे क्रिकेट खेळण्याची आहे,’’ असे कर्णधार गौतम गंभीर दिल्ली डेअर डेव्हिल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी म्हणाला.
‘‘गेल्या वर्षीच्या आठवणी आम्ही मागे सारल्या आहेत. आताच्या घडीला मैदानात जाऊन कसलेच दडपण न घेता बिनधास्तपणे क्रिकेट खेळायची गरज आहे,’’ असे गंभीरने सांगितले.
तो पुढे म्हणाला की, ‘‘गतविजेते असलो तरी त्याचे दडपण आमच्यावर नाही. पण यामुळे आत्मविश्वास नक्कीच दुणावलेला आहे. आमच्या संघात चांगली गुणवत्ता आहे, पण आता वेळ आहे ती गुणवत्ता मैदानात दाखवण्याची. कोणत्या एकटय़ाचा आम्ही विचार करीत नाही, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे त्यामुळे आम्ही संघाचाच विचार पहिला करतो.’’
ख्रिस गेल, रॉयल चॅलेंजर्सचा सलामीवीर
बंगळुरूच्या रॉयल चॅलेंजर्सच्या संघात दाखल झाल्यावर आम्ही सर्वानीच कसून सराव केला आहे. या वर्षीची आयपीएल आम्हीच जिंकणार.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा