आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील १८ वा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जातोय. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन संघ एकमेकांशी दोन हात करत आहेत. दरम्यान फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईची सुरुवात चांगली झाल्यानंतर ६० धावांनंतर मात्र हा संघ खिळखिळा झाला. मुंबईचा अर्धा संघ अवघ्या ६२ धावांवर तंबुत परतला. बंगळुरुच्या खेळाडूंनी चांगला खेळ करत मुंबईच्या फलंदाजांना चांगल्या पद्धतीने रोखून धरलं. ग्लेन मॅक्सवेलने तिक वर्माला धावबाद केल्याची तर चांगलीच चर्चा होत आहे. चेंडू हातात येताच मॅक्सवेलने चपळाईने स्टंप्स उडवले आहेत. त्याच्या मॅक्सवेलच्या या कामगिरीमुळे तिलक वर्माला शून्यावर तंबुत परतावं लागलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> IPL 2022, SRH vs CSK : चेन्नईचा सलग चौथा पराभव, हैदराबादचा आठ गडी राखून दणदणीत विजय

दहाव्या षटकात तिलक वर्मा धावबाद

देवाल्ड ब्रेविस आणि रोहित शर्मा हे आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचे फलंदाज ठराविक अंतरावर बाद होत गेले. पाचव्या विकेटसाठी तिलक वर्मा चांगली फलंदाजी करेल अशी अपेक्षा होती. मात्र मैदानात फलंदाजीसाठी उतरताच आकाशदीपने टाकलेल्या दहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर तो धावबाद झाला. मैदानावर येताच तिलकने बचावात्मक पवित्रा घेतला होता. पहिल्या चेंडूचा सामना करताना त्याने फक्त चेंडूसमोर बॅट पकडली. त्यानंतर त्याने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र समोर उभा असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने चेंडू पकडून हवेत झेप घेत थेट स्टंप्स उडवले. त्यामुळे तिलक वर्मा धावबाद होऊन शून्यावर तंबुत परतला.

हेही वाचा >>> Video : मुंबई-बंगळुरु सामन्यापूर्वी विराटला संताप अनावर, सराव करताना बॅटवर काढला राग, नेमकं काय घडलं ?

हेही वाचा >>> Video | चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडवर हैदराबादचा नटराजन पडला भारी, पहिल्याच चेंडूवर उडवला त्रिफळा

दरम्यान, ६० धावांनंतर मुंबई इंडियन्सचे फलंदाज बाद होत गेले. मुंबई इंडियन्स दोनशे धावांपर्यंत मजल मारेल अशी अपेक्षा असताना ७९ धावांपर्यंत मुंबईचे सहा फलंदाज बाद झाले होते. मुंबई ६२ धावांवर असताना इशान किशन, तिलक वर्मा आणि किरॉन पोलार्ड असे तीन गडी बाद झाले. त्यामुळे मुंबईचा संघ खिळखिळा झाला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tilak varma run out by glenn maxwell in ipl 2022 mi vs rcb match prd