Tim David Smashes Three Consecutive Sixes Video Viral : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलचा ४२ वा सामना वानखेडे मैदानात रंगला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ७ विकेट्स गमावत २१२ धावांपर्यंत मजल मारली होती. परंतु, या धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सने १९.३ षटकात ४ विकेट्स गमावत २१४ धावा करून राजस्थान रॉयल्सविरोधात दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे मुंबईला विजयासाठी शेवटच्या षटकात १७ धावांची गरज असताना टीम डेव्हिडने षटकार हॅट्रिक मारली अन् राजस्थानचा दारूण पराभव झाला. वानखेडे मैदानावर आतापर्यंतची सर्वात मोठी रन चेज खुद्द मुंबईच्या संघाने या सामन्यादरम्यान केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलामीला आलेला कर्णधार रोहित शर्मा फक्त तीन धावांवर असताना संदीप शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर इशान किशन २८ धावा करून तंबूत परतला. मात्र कॅमरून ग्रीन आणि सूर्यकुमारने आक्रमक खेळी करून धावंसख्येचा आलेख चढता ठेवला. ग्रीनने ४४ धावा केल्या तर सूर्यकुमारने २९ चेंडूत ५५ धावा कुटल्या. हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि टीम डेव्हिडने मैदानात धावांचा पाऊस पाडला. डेव्हिडने १४ चेंडूत ४५ धावांची आक्रमक खेळी केली. तर तिलक वर्माने २९ धावा केल्या.

नक्की वाचा – वाढदिवशी रोहित शर्माला मिळालं भन्नाट गिफ्ट! क्लीन बोल्डचा अंपायरचा निर्णय चुकीचा? Video पाहून थक्क व्हाल

इथे पाहा व्हिडीओ

राजस्थान रॉयल्ससाठी यशस्वी जैस्वाल आणि जॉस बटलर सलामीला फलंदाजीसाठी मैदानात उतरला. एरव्ही धडाकेबाज फलंदाजी करणारा बटलर आजच्या सामन्यात धावांसाठी संघर्ष करताना दिसला. पीयुष चावलाच्या गोलंदाजीवर बटलर १८ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर यशस्वी जैस्वालने वानखेडे मैदानात धावांचा पाऊस पाडला. मैदानात चारही दिशेला मोठे फटके मारून जैस्वालन मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. जैस्वालने ६२ चेंडूत ८ षटकार आणि १६ चौकारांच्या मदतीनं १२४ धावा कुटल्या.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tim david smashes three consecutive sixes when mumbai indians need 17 runs to win against rajasthan royals watch video nss
Show comments