Fan hurt by Tim David’s shot : आयपीएल २०२४ मधील ४३वा सामना दिल्ली कॅपटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अरुण जेटली स्टेडियवर पार पडला. ज्यामध्ये दिल्ली कॅपटल्सने मुंबई इंडियन्सचा १० धावांनी पराभव केला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना मुंबईला २५८ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात मुंबई संघाला २४७ धावाच करता आल्या. या सामन्यादरम्यान मुंबईचा स्टार खेळाडू टीम डेव्हिडने जबरदस्त फटकेबाजी केली. या फटकेबाजीच्या दरम्यान त्याने एक असा षटकार मारला, ज्यामुळे स्टँडमध्ये बसलेल्या एका चाहत्याला दुखापत झाली. ज्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम डेव्हिडच्या षटकाराने चाहत्याला झाली दुखापत –

टीम डेव्हिडने शॉट खेळताच स्टँडवर बसलेले चाहते चेंडू पकडण्याचा प्रयत्न करत होते, मात्र गर्दीत चेंडू एका चाहत्याच्या तोंडावर आदळला. त्यानंतर चाहत्याला तातडीने वैद्यकीय कक्षात नेण्यात आले. क्रिकेटच्या मैदानावर हे अनेकदा पाहायला मिळते. या सामन्यातही असेच काहीसे घडले. फॅनच्या स्थितीबाबत अद्याप कोणतेही अपडेट देण्यात आलेली नाही. मात्र, आता त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत पाचवे स्थान गाठले. संघाच्या खात्यात आता १० गुण आहेत. त्याचवेळी मुंबई ६ गुणांसह नवव्या स्थानावर आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत ४ गडी गमावून २५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला २० षटकांत ९ गडी गमावून २४७ धावा करता आल्या. तिलक वर्माने मुंबईसाठी दमदार कामगिरी केली. युवा फलंदाजाने ६३ धावांची दमदार खेळी केली. मात्र, तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. या सामन्यात एमआयने पॉवरप्लेमध्ये तीन गडी गमावले.

हेही वाचा – DC vs MI : दिल्लीच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानंतर हार्दिक पंड्या अंपायरवर संतापला, काय होत कारण?

रोहित शर्मा ८, इशान किशन २० आणि सूर्यकुमार यादव २६ धावा करून परतला. यानंतर हार्दिक पंड्याने कर्णधारपदाला साजेशी खेळी साकारली. त्याने ४६ धावांची तुफानी खेळी केली. नेहलने ४, टीम डेव्हिडने ३७ धावा, मोहम्मद नबीने ७ धावा, पियुष चावलाने १० धावा आणि ल्यूक वुडने (नाबाद) ९ धावा केल्या. . दिल्लीकडून जेक फ्रेझरने ८४ धावांची शानदार खेळी केली. शाई होपने ४१ धावा केल्या. त्याचबरोबर गोलंदाजीकरताना रसिख सलाम आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी तीन विकेट्ल घेतल्या. त्याचबरोबर खलील अहमदने दोन गडी बाद केले. दिल्लीकडून जेक फ्रेझरने ८४ धावांची शानदार खेळी केली. शाई होपने ४१ धावा केल्या.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tim davids six hits fan on his face as he tries to catch in the stands during dc vs mi match vbm