सुरुवातीच्या सामन्यांमध्ये झालेल्या खराब कामगिरीमुळे चेन्नई सुपरकिंग्जचं आयपीएलच्या तेराव्या हंगामातलं आव्हान संपुष्टात आलं. परंतू अखेरच्या ३ सामन्यांमध्ये धोनी ब्रिगेडने संघात महत्वपूर्ण बदल करत अनेक संघांचं गणित बिघडवलं. अबु धाबीच्या मैदानावर पंजाबविरुद्ध आपला अखेरचा सामना खेळत असणाऱ्या चेन्नईने ९ गडी राखत सामना जिंकला. चेन्नईच्या या विजयामुळे पंजाबचंही या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. एरवी अंतिम फेरीच्या शर्यतीत असणारा पंजाबचा संघ यंदा आपल्या फॉर्मात नव्हता. यासाठी सोशल मीडियावर त्यांना चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. परंतू अखेरच्या सामन्यांत धडाकेबाज कामगिरी करत धोनीने पुढच्या हंगामात आम्ही पुनरागमन करु असं आश्वासन दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवश्य वाचा – IPL 2020 : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा विक्रम, सलग तिसऱ्या सामन्यात झळकावलं अर्धशतक

“ही स्पर्धा खरंच खूप खडतर होती, आम्ही चुकाही खूप केल्या. शेवटच्या ४ सामन्यांमध्ये आम्ही जसा खेळ केला तसा खेळ करणं अपेक्षित होतं. माझ्या सर्व खेळाडूंचा मला अभिमान आहे. सतत पराभव होत असणाऱ्या ड्रेसिंग रुममध्ये राहणं कोणालाही आवडत नाही. पुढच्या वर्षी बीसीसीआय लिलावासंदर्भात काय निर्णय घेतं याकडे आमचं लक्ष आहे. आमच्या प्रमुख खेळाडूंच्या सेटअपमध्ये आम्हाला थोडे बदल करायचे आहेत, पुढील ९-१० वर्षांसाठी संघ बांधणीचा विचार करायचा आहे. सुरुवातीच्या सामन्यांपासून गेली १० वर्ष संघासोबत असणाऱ्या खेळाडूंना आम्ही संधी दिली, आता नवीन खेळाडूंना ही जबाबदारी देण्याची वेळ आली आहे. चाहत्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की पुढच्या हंगामात आम्ही दमदार पुनरागमन करु, यासाठीच आम्ही ओळखले जातो.” सामना संपल्यानंतर धोनीने संघाच्या कामगिरीवर आपली प्रतिक्रिया दिली.

१५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या फलंदाजांनी आश्वासक सुरुवात केली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु-प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी करत सामना पंजाबच्या हातातून हिसकावून घेतला. ऋतुराज गायकवाडने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत ४९ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ६२ धावांची खेळी केली. चेन्नईकडून सलग ३ सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावण्याचा बहुमान ऋतुराजच्या नावे जमा झाला आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : फॉर्मात राहण्यासाठी धोनीला ‘हे’ करावच लागेल, दिग्गज खेळाडूने दिला सल्ला

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Time to hand it over to the next generation says ms dhoni after csk beat kxip by 9 wickets in last match psd