Tom Moody Questions Umpires’ Decisions: लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळला गेला आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लखनऊने सात गडी राखून हैदराबवर विजय मिळवला. या सामन्यात आवेश खानने टाकलेल्या नो बॉललरुन बराच वाद पाहिला मिळाला. मात्र, माजी क्रिकेटपटू टॉम मूडीने या सामन्यादरम्यान अंपायरच्या निर्णयावर संताप व्यक्त केला. लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज आवेश खानने शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू टाकला, ज्याला पंचांनी नो बॉल घोषित केले.
त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सने पंचांच्या निर्णयाविरुद्ध रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. लखनऊ सुपर जायंट्सने रिव्ह्यू घेतल्यानंतर, तिसर्या पंचांना आवेश खानचा चेंडू नो बॉल असल्याचे आढळले, कारण उंची खूप होती, परंतु तिसऱ्या पंचाने मैदानावरील पंचाचा निर्णय रद्द केला आणि त्याला यो बॉल असल्याचे म्हटले. यावरुन वादाला सुरुवात झाली.
‘अंपायर चुकीच्या निर्णयासाठी इतका वेळ कसा काय घेऊ शकतात?’
टॉम मूडी यांनी ट्विटरवर लिहिले की, “चुकीच्या निर्णयासाठी अंपायर इतका वेळ कसा घेऊ शकतो? नो बॉल हा हॅशटॅगही वापरला.” वास्तविक, पंचांनी नो बॉल न देण्याच्या निर्णयाने टॉम मूडी खूपच नाराज दिसत दिसले. टॉम मूडी व्यतिरिक्त मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल मॅकक्लेनघननेही ट्विट केले आहे. मिशेल मॅकक्लेनघननेही टॉम मूडीच्या शब्दांशी सहमती दर्शवली आहे. मिशेल मॅकक्लेनघन यांनी लिहिले की, “पंचांचा नो बॉल न देण्याचा निर्णय आश्चर्यकारक होता.”
हेही वाचा – SRH vs LSG: हैदराबादमध्ये नो-बॉलवरून वाद; लखनऊ सुपरजायंट्सच्या डगआऊटशी प्रेक्षकांचे गैरवर्तन, पाहा VIDEO
वास्तविक पहिल्या डावाचे १९ षटक टाकण्यासाठी आवेश खान आला होता. आवेश खानने अब्दुल समदला टाकलेला तिसरा चेंडू कंबरेच्या वर होता. त्यामुळे मैदानी पंचांनी हा नो बॉल घोषित केला. त्यानंतर लखनऊने या चेंडूबाबत रिव्ह्यू घेतला, पण तिसऱ्या पंचांनी तो चेंडू योग्य असल्याचे सांगितले. त्यानंतर समद नाराज दिसला. या निर्णयावर प्रेक्षकही नाराज दिसले. दरम्यान काही प्रेक्षकांनी लखनऊ सुपरजायंट्सच्या डगआऊटच्या दिशेने नट आणि बोल्ट फेकले.