Top 5 Youngest Players In IPL History: अनेक असे युवा खेळाडू आहेत ज्यांनी आयपीएल स्पर्धेत पदार्पण करून पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं आहे. आता या यादीत आणखी एका युवा खेळाडूचा समावेश झाला आहे. राजस्थान रॉयल्सने १.१ कोटीत खरेदी केलेल्या वैभव सूर्यवंशीने वयाच्या १४ व्या वर्षी पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच सामन्यातील पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार खेचला होता.

आता तिसऱ्या सामन्यात त्याने या हंगामातील सर्वात वेगवान शतक झळकावलं आहे. आयपीएल स्पर्धेत पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. यासह सर्वात युवा शतकवीर देखील ठरला आहे. दरम्यान कोण आहेत आयपीएलमध्ये पदार्पण करणारे सर्वात युवा खेळाडू? जाणून घ्या.

वैभव सूर्यवंशी (१४ वर्ष २३ दिवस)

वैभव सूर्यवंशी हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने त्याला १.१ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं होतं. लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात त्याने २० चेंडूत ३४ धावांची खेळी केली.

प्रयास रे बर्मन ( १६ वर्ष, १५७ दिवस)

प्रयास रे बर्मनला २०१९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. ज्यावेळी त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं, त्यावेळी त्याचं वय १६ वर्ष (१६ वर्ष १५७ दिवस) इतकं होतं. मात्र, त्यानंतर त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

मुजीब उर रहमान (१७ वर्ष, ११ दिवस)

अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर रहमान हा या स्पर्धेच्या इतिहासातील तिसरा सर्वात युवा खेळाडू आहे. त्याने वयाच्या १७ व्या (१७ वर्ष ११ दिवस) वर्षी पदार्पण केलं होतं. त्याला पंजाबने ४ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं होतं.

रियान पराग ( १७ वर्ष, १५२ दिवस)

राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व करत असलेला रियान पराग या स्पर्धेच्या इतिहासातील चौथा सर्वात युवा खेळाडू आहे. त्याने २०१९ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केलं होतं. ज्यावेळी त्याने पदार्पण केलं त्यावेळी १७ वर्षांचा (१७ वर्ष, १५२ दिवस) होता.

प्रदीप सांगवान ( १७ वर्ष १७९ दिवस)

डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवानने आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप २०१९ स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. या कामगिरीच्या बळावर त्याला दिल्लीने आपल्या संघात स्थान दिलं होतं.