IPL 2025 Trent Boult Clean Bowled Phil Salt Video: आयपीएल २०२५ च्या रायव्हलरी विकमधील पहिलाच सामना मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये खेळवला जात आहे. वानखेडेवर होत असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात संघाचा सर्वात महत्त्वाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह परतला आहे. तर गेल्या सामन्यात संघाबाहेर असलेला माजी कर्णधार रोहित शर्माही परतला आहे. मुंबईच्या ताफ्यात बोल्ट, चहर आणि बुमराह ही कमालीची गोलंदाजी तिकडी दिसणार आहे. यापैकी बोल्टची पहिल्याच षटकात जादू पाहायला मिळाली.

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात जसप्रीत बुमराह परतल्याने अश्वनी कुमारला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. रोहित शर्मा या सामन्यातही इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळताना दिसणार आहे. तर आरसीबीच्या ताफ्यात कोणताच बदल करण्यात आलेला नाही.

मुंबईकडून बोल्टच्या हातात पहिला चेंडू होता. तर आरसीबीकडून फिल सॉल्ट आणि विराट कोहलीची जोडी सलामीसाठी उतरली. बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर सॉल्टने चौकार मारत दणक्यात सुरूवात केली. पण बोल्टने पुढच्याच चेंडूवर आपल्या भेदक गोलंदाजीने थेट मिडल स्टंपला दणका देत सॉल्टला क्लीन बोल्ड केलं.

आरसीबीने पहिल्याच षटकात विकेट गमावली असली तरी त्यांच्या आक्रमक फलंदाजीची झलक पाहायला मिळाली. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी पॉवरप्लेमध्ये ६ षटकांत १ बाद ७३ धावा केल्या. तर संघाने १० षटकांत १०० धावांचा आकडा गाठला. देवदत्त पडिक्कल विघ्नेश पुथूरच्या गोलंदाजीवर ९व्या षटकात झेलबाद झाला. तर विराट कोहलीने विघ्नेश पुथूरच्या गोलंदाजीवर षटकार लगावत २९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

आरसीबीची प्लेईंग इलेव्हन

फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल

मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन

विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विघ्नेश पुथूर