Trent Boult become first bowler to take most wickets in first over : आयपीएल २०२४ चा १४ वा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात लाजिरवाणी झाली. आरआरचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने मुंबई इंडियन्सच्या टॉप ऑर्डरला सुरुंग लावला. यादरम्यान बोल्टने एक खास विक्रमही आपल्या नावावर केला. त्याचबरोबर रोहित शर्मानेही एका नकोशा विक्रमाची नोंद केली.

ट्रेंट बोल्टने रचला इतिहास –

राजस्थान रॉयल्सकडून पहिले षटक ट्रेंट बोल्टने टाकले. षटकाच्या ५व्या चेंडूवर त्याने एमआयच्या माजी कर्णधाराला बाद केले. संजू सॅमसनने विकेटच्या मागे रोहितचा अप्रतिम झेल घेतला. रोहितला खातेही उघडता आले नाही आणि तो गोल्डन डकचा बळी ठरला. त्याचबरोबर सहाव्या चेंडूवर त्याने नमन धीरला एलबीडब्ल्यू बाद करत इतिहास रचला. तो आयपीएलच्या पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. बोल्टने आयपीएलच्या पहिल्याच षटकात आतापर्यंत २६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने हा पराक्रम अवघ्या ८० डावात केला आहे. याआधी भुवनेश्वर कुमारने आयपीएलच्या पहिल्याच षटकात २५ विकेट घेतल्या होत्या. त्याने ११६ डावात ही कामगिरी केली होती.

Arshdeep Singh Becomes India Most Successful T20I Fast Bowler Surpasses Jasprit Bumrah and Bhuvneshwar Kumar with 92 Wickets IND vs SA
IND vs SA: अर्शदीप सिंगने बुमराह-भुवनेश्वरला मागे टाकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
Indian Cricket Team Creates History Becomes First Team To Score 5 T20I International Century in 2024 IND vs SA Tilak Varma
IND vs SA: तिलक वर्माच्या शतकासह भारतीय संघाने घडवला इतिहास, टी-२० क्रिकेटमध्ये २०२४ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ

ट्रेंट इथेच थांबला नाही आणि त्याने पहिल्या षटकात दोन विकेट्स घेतल्यानंतर आपल्या दुसऱ्या षटकातही राजस्थानला तिसरे यश मिळवून दिले. त्याने डेवाल्ड ब्रेव्हिसला झेलबाद केले. ब्रेव्हिसही गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये परतला. बोल्टच्या आक्रमक गोलंदाजीमुळे मुंबईची आघाडीची फळी झटपट पॅव्हेलियनमध्ये परतली. बोल्टने पहिल्याच षटकात २ विकेट्स घेतले. यासह तो आयपीएलच्या पहिल्याच षटकात सर्वाधिक वेळा २ विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. हा पराक्रम त्याने आतापर्यंत पाचवेळा केला आहे. याआधी डेल स्टेन, प्रवीण कुमार आणि उमेश यादव यांनी आयपीएलच्या पहिल्या षटकात प्रत्येकी २ वेळा ही कामगिरी केली आहे.

हेही वाचा – MI vs RR : रविचंद्रन अश्विनने मुंबईविरुद्ध झळकावलं अनोखं द्विशतक, धोनी-विराटच्या ‘या’ खास क्लबमध्ये झाला सामील

रोहित शर्माच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद –

या सामन्यात मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माने एक नकोसा विक्रम नोंदवला आहे. आता आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नावावर एक अतिशय लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये १७ वेळा गोल्डन डकवर आऊट झाला आहे. याआधी आयपीएलमध्ये हा लज्जास्पद विक्रम आरसीबीच्या दिनेश कार्तिकच्या नावावर होता. कार्तिक आयपीएलमध्ये १७ वेळा गोल्डन डकवर आऊट झाला आहे. या दोघांशिवाय पियुष चावला, मनदीप सिंग, सुनील नरेन आणि ग्लेन मॅक्सवेल हे प्रत्येकी १५ वेळा गोल्डन डक झाले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे फलंदाज –

रोहित शर्मा – १७*
दिनेश कार्तिक – १७
पियुष चावला- १५
मनदीप सिंग – १५
सुनील नरेन- १५
ग्लेन मॅक्सवेल- १५