Trent Boult overtakes Dale Steyn to become 21st bowler to take 100 wickets in IPL: आयपीएलच्या १६व्या हंगामातील ३२ वा सामना सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) यांच्यात बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत शानदार सुरुवात केली. राजस्थान संघाचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने डावाच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीच्या रूपाने मोठा धक्का दिला. त्याने विराट कोहली त्याला गोल्डन डकवर बाद करत एक खास कारनामा केला.
विराट कोहलीला बाद करत ट्रेंट बोल्टने डेल स्टेनला मागे टाकले –
विराट कोहलीला बाद करून ट्रेंट बोल्टने आपल्या नावावर एक खास विक्रम नोंदवला आहे. बोल्टने विराट कोहलीला एलबीडब्ल्यू आऊट केले. या विकेटसह त्याने आयपीएलमधील १०० बळी पूर्ण केले. यानंतर बोल्टने शाहबाज अहमदलाही बाद केले. आता आयपीएलमध्ये १०० बळी घेणारा २१गोलंदाज ठरला आहे. डेल स्टेनला मागे टाकत त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. डेल स्टेनच्या नावावर ९५ सामन्यात ९७ विकेट्स आहेत आणि तो निवृत्तही झाला आहे.
विराट कोहली २३ एप्रिलला तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला –
कोहलीसाठी, २३ एप्रिलचा दिवस त्याच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी देखील वाईट म्हणता येईल, ज्यामध्ये तो या तारखेला आतापर्यंत 3 वेळा शून्यावर आऊट झाला आहे. २०१७ मध्ये कोलकाता, त्यानंतर २०२२ मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि या मोसमात विराट कोहली राजस्थानविरुद्ध गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. या सामन्यापूर्वी विराट कोहलीचा आतापर्यंत चांगलाच फॉर्म पाहायला मिळाला असून त्याने ४६.५० च्या सरासरीने २७९ धावा केल्या आहेत.
हेही वाचा – Sachin Tendulkar @50: वाढदिवस साजरा करण्यासाठी सचिन तेंडुलकर कुटुंबासह गोव्यात पोहोचला; पाहा VIDEO
गोल्डन डकवर आऊट होणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला –
या मोसमात गोल्डन डकवर आऊट होणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. विराट कोहली त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १०व्यांदा शून्यावर बाद झाला आहे. २०२२ आणि २०१४ मध्ये खेळलेल्या मोसमात विराट कोहली खाते न उघडता ३-३ वेळा पॅव्हेलियनमध्ये परतला होता.