Rajasthan Royals vs Punjab Kings Match Updates: प्रभसिमरन सिंगने आयपीएल २०२३ मध्ये पंजाब किंग्जसाठी चांगली कामगिरी केली आहे. याआधीही त्याने अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. पण त्याला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात फार काही खास करता आले नाही. धरमशाला येथील तो अवघ्या दोन धावा करून बाद झाला. ट्रेंट बोल्टने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सामन्याच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर बोल्टने आपल्याच गोलंदाजीवर अप्रतिम झेल घेतला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खरं तर, नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थानने पंजाबविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान पंजाबकडून प्रभसिमरन आणि शिखर धवन सलामीला आले. पण प्रभासिमरन दोन चेंडूत दोन धावा करून बाद झाला. यादरम्यान राजस्थानने पहिले षटक ट्रेंट बोल्टकडे सोपवले होते. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बोल्टने प्रभासिमरनला बळी बनवले. या चेंडूवर प्रभासिमरनने शॉट खेळला, चेंडू थेट बोल्टकडे गेला.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Pakistani Cricketer Called Indian Players Kafirs Mohinder Amarnath Recounts 1978 Tour of Pakistan in His Memoir
भारतीय खेळाडू ‘काफिर’; पाकिस्तानी खेळाडूची टीम इंडियावर आगपाखड, भारताच्या माजी खेळाडूने सांगितला ‘तो’ प्रसंग
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
BPL 2025 Mohammad Nawaz and Tanzim Hasan fight during Khulna Tigers vs Sylhet Strikers match
BPL 2025 : लाइव्ह मॅचमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये जुंपली, वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
IND W vs IRE W Jemimah Rodrigues century helps Indian womens team register highest ODI score against Ireland
IND W vs IRE W : जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम

यानंतर बोल्टने हवेत उडी मारून हा अवघड झेल पकडला –

आयपीएलने ट्रेंट बोल्टच्या शानदार झेलचा व्हिडीओ ट्विट केला आहे. अल्पावधीतच शेकडो लोकांना तो आवडला आहे. यासोबतच त्यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रियाही आल्या आहेतक. बोल्टच्या या झेलचे चाहत्यांनी कौतुक केले. या सामन्यात प्रभसिमरन बाद झाल्यानंतर अथर्व तायडेही लवकरच बाद झाला. त्याने १२ चेंडूत १९ धावा केल्या. त्यामुळे पंजाबच्या अडचणी वाढल्या.

हेही वाचा – RR vs PBKS: जितेश शर्मा, शाहरुख खान आणि सॅम करणची कमाल! पंजाब किंग्जचे राजस्थान रॉयल्सला १८८ धावांचे लक्ष्य

राजस्थानला १८८ धावांचे लक्ष्य –

पंजाब किंग्जसमोर राजस्थान रॉयल्सला खडतर लक्ष्य मिळाले आहे. पंजाबने २० षटकांत ६ बाद १८७ धावा केल्या आहेत. राजस्थानला प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी १८८ धावा कराव्या लागतील. पंजाबकडून सॅम करनने ३१ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. जितेश शर्माने ४४ आणि शाहरुख खानने २३ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या.

हेही वाचा – CSK Team: “…तर एमएस धोनी पुढील हंगामात खेळताना दिसेल”; माहीच्या खेळण्याबाबत रॉबिन उथप्पाने सांगितली महत्त्वाची अट

अथर्व तायडेने १९आणि शिखर धवनने १७धावांचे योगदान दिले. लियाम लिव्हिंगस्टोनने नऊ आणि प्रभसिमरन सिंगने दोन धावा केल्या. राजस्थानकडून नवदीप सैनीने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याने अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांना बाद केले. ट्रेंट बोल्ट आणि अॅडम झाम्पाला प्रत्येकी एक यश मिळाले.

Story img Loader