Tristan Stubbs fielding video viral : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा ४ धावांनी पराभव केला. दिल्लीला हा विजय मिळवून देण्यात कर्णधार ऋषभ पंत, अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज रसिख सलाम दारचे योगदान होते. त्याशिवाय ट्रिस्टन स्टब्सचे मोठे योगदान होते. स्टब्सने संघासाठी शानदार फिल्डिंग करत १९व्या षटकात पाच धावा वाचवून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. स्टब्सने सीमारेषेवर राशिद खानचा षटकार रोखत ५ धावा वाचवल्या आणि दिल्लीने ४ धावांनी विजय मिळवला. स्टब्सच्या या शानदार फिल्डिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्रिस्टन स्टब्सने शानदार फिल्डिंगच्या जोरावर वाचवल्या ५ धावा –

दिल्ली कॅपिटल्सकडून १९ वे षटक टाकण्यासाठी वेगवान गोलंदाज रसिख सलाम दार आला होता. त्यावेळी गुजरात टायटन्ससाठी फलंदाजी करत असलेल्या राशिद खानने रसिख दार सलामच्या स्लोअर चेंडूवर लाँग ऑफवर एक दमदार शॉट मारला. त्याचा हा जोरदार शॉट पाहून चेंडू षटकारासाठी सहज जाईल असे वाटत होते. पण अचानक ट्रिस्टन स्टब्स सीमारेषेजवळ धावत आला आणि त्याने हवेत उंच उडी मारून चेंडूला सीमारेषा ओलांडण्यापासून रोखले. त्याने चेंडूला आत ढकलला आणि स्वत: सीमारेषेच्या बाहेर गेला.

अशा पद्धतीने त्याने आपल्या संघासाठी ५ धावा वाचवल्या. त्याच्या या शानदार फिल्डिंगमुळे दिल्लीला विजय मिळवता आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. स्टब्सचा हा प्रयत्न खरोखरच पाहण्यासारखा होता. त्याच्या प्रयत्नांमुळे दिल्लीचा विजय जवळ आला. १९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर क्षेत्ररक्षणाचा हा शानदार प्रयत्न पाहायला मिळाला.

हेही वाचा – DC vs GT : रसिख सलाम दारला ‘ती’ चूक पडली महागात, बीसीसीआयने वेगवान गोलंदाजाला फटकारले

दिल्लीचा गुजरातवर ४ धावांनी निसटता विजय –

अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून २२४ धावा केल्या होत्या. संघासाठी, कर्णधार ऋषभ पंतने ४३ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने नाबाद ८८* धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. याशिवाय अक्षर पटेलने ४३ चेंडूंत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्स संघाला २० षटकांत केवळ २२० धावा करता आल्या. साई सुदर्शनने ३९ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकार लगावत संघासाठी ६५ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. पण, सुदर्शनची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tristan stubbs fielded brilliantly to save 5 runs as dc won by 4 runs against gt in ipl 2024 video viral vbm