RCB vs RR Eliminator Match Highlights: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएल २०२४ मधून बाहेर पडला आहे. एलिमिनेटर सामन्यात आरसीबीला राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला. आरसीबीने सलग ६ सामने जिंकून प्ले ऑफमध्ये स्थान पक्के केले होते. तर दुसरीकडे, राजस्थानला मे महिन्यात एकही विजय मिळवता आला नाही. मात्र एलिमिनेटर सामन्यात संजू सॅमसनच्या संघाला आरसीबीचा पराभव करत विजय मिळवण्यात यश आले.

एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली होती. प्रथम फाफ डू प्लेसिस आणि नंतर विराट कोहली बाद झाल्यानंतरही संघ सतत धावा करत होता. पण राजस्थानच्या गोलंदाजीसमोर आऱसीबीच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि त्यांनी ठराविक अंतराने विकेट गमावले. आरसीबीचा संघातील मॅक्सवेल वगळता प्रत्येक खेळाडूने धावांचे योगदान दिले. आऱसीबीचा संघ जर अधिक १०-२० धावा करू शकला असता तर या सामन्यात त्यांना चांगली टक्कर देता आली असती. पण या सामन्याचा नेमका टर्निंग पॉईंट काय ठरला, जाणून घेऊया.

IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
PAK vs SA Corbin Bosch takes wicket on first ball of Test career to create new record
PAK vs SA: पदार्पणाच्या कसोटीत आफ्रिकेच्या खेळाडूने पहिल्याच चेंडूवर केला मोठा विक्रम, १३५ वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
IND vs AUS Ricky Ponting statement on Virat Kohli and Sam Konstas argument at MCG
IND vs AUS : “त्याने टक्कर होण्यास…”, विराट-कॉन्स्टासच्या धक्काबुकीवर प्रकरणावर रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य
IND vs AUS Boxing Day Test Virat Kohli and Sam Konstas argument video viral
IND vs AUS : विराट आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात झाली धक्काबुक्की! पंचांसह ख्वाजाला करावी लागली मध्यस्थी, पाहा VIDEO
IND vs AUS boxing day test 2024
IND vs AUS : रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! ‘या’ स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून दाखवला बाहेरचा रस्ता
Pakistan Beat South Africa by 80 Runs and Seal ODI Series
PAK vs SA: पाकिस्तान क्रिकेट बोर्डात गोंधळ आणि बंडाळ्या पण संघाची कमाल; आफ्रिकेला घरच्या मैदानावर दिला दणका

हेही वाचा – हार्दिक पंड्या – नताशा स्टॅनकोविक विभक्त होणार? इन्स्टाग्रामवर केला मोठा बदल, चर्चांना उधाण

काय ठरला आरसीबीच्या पराभवाचा टर्निंग पॉईंट?

आर अश्विन यंदाच्या हंगामात सुरूवातीला काही चांगली कामगिरी करू शकला नव्हता. पण एलिमिनेटर सामन्यात संघाच्या विजयात त्याने
मोठी भूमिका बजावलाी. अश्विनने लागोपाठ दोन चेंडूत दोन विकेट घेत सामन्याचे रूप पालटले. आधी सेट झालेल्या कॅमेरून ग्रीनला त्याने बाद केले. त्याने कॅरम बॉल टाकला ज्यावर ग्रीनने मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट रोव्हमन पॉवेलने टिपला.

पुढच्याच चेंडूवर अश्विनने आरसीबीला आणखी मोठा धक्का दिला. टी-२० मधील मोठ्या फलंदाजांपैकी एक असलेला ग्लेन मॅक्सवेल गोल्डन डक ठरला. तो येताच मॅक्सवेलने अश्विनवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मॅक्सवेलने पहिल्याच चेंडूवर लाँग ऑनच्या दिशेने षटकार मारण्याचा प्रयत्न केला पण तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या ध्रुव जुरेलने त्याचा सहज झेल टिपला. अशाप्रकारे आरसीबीची धावसंख्या ९७ धावांवर २ विकेट्सवरून केवळ दोन चेंडूत ९७ धावांवर ४ विकेट्स अशी झाली.

दोन चेंडूंमध्ये दोन महत्त्वाचे फलंदाज गमावल्यानंतर आरसीबीने संघर्ष सुरूच ठेवला. संघाला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १७२ धावा करता आल्या. रविचंद्रन अश्विनने ४ षटकांत १९ धावा देत २ मोठे विकेट घेतले. प्रत्युत्तरात राजस्थानने १९ षटकांत ६ गडी गमावून लक्ष्य गाठले. ४५ धावांची सर्वात मोठी खेळी यशस्वीच्या बॅटमधून आली. तर रियान पराग, शिमरॉन हेटमायर आणि रोव्हमन पॉवेलच्या फटकेबाजीने संघाला विजय मिळवून दिला.

Story img Loader