What to do for blue ticks on twitter account: मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरने भारतीय क्रिकेट संघातील अनेक दिग्गज आणि स्टार खेळाडूंच्या ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टिक्स हटवली आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी आपल्या व्हेरिफाइड अकाऊंटसाठी शुल्क भरण्यासाठी ब्लू टिक असलेल्या ट्विटर हँडलला २० एप्रिलपर्यंत मुदत दिली होती, अन्यथा ब्लू टिक काढून टाकण्यात येईल असे सांगितले होते. ट्विटरने ब्लू टिकसाठी ६५९ रुपये (वेबसाइट) आणि ९०० रुपये (मोबाइल अॅप) मासिक सदस्यता शुल्क निश्चित केले आहे. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीपासूनच सर्व क्रिकेटपटूंच्या ब्लू टिक्स हटवल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ट्विटरने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, सौरव गांगुली, ऋषभ पंत, एमएस धोनी, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, आकाश चोप्रा यांच्या अकाउंटवरून ब्लू टिक हटवली आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव, वीरेंद्र सेहवाग, शुबमन गिल, मोहम्मद कैफ, अजिंक्य रहाणे, कृणाल पांड्या, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांच्यासह अनेक खेळाडूंच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक्स हटवण्यात आल्या आहेत.

ब्लू टिक हवी असेल तर काय करावे लागेल?

जर एखाद्या ट्विटर वापरकर्त्याला ब्लू टिक हवी असेल किंवा वापरकर्त्यास आधीपासून ब्लू टिक असेल आणि ती टिकवून ठेवायची असेल तर त्याला ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घ्यावे लागेल. भारतात या सदस्यत्वासाठी दोन शुल्क निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये, वेबसाइट अर्थात डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वापरकर्त्यांसाठी ६५० रुपये शुल्क भरावे लागेल, तर मोबाइल वापरकर्त्यांना ९०० रुपये प्रति महिना भरावे लागतील.

हेही वाचा – KKR vs DC: केकेआरच्या खराब फलंदाजीमुळे संतप्त झालेल्या युवराज सिंगने मनदीप आणि रिंकूवर ओढले ताशेरे; म्हणाला,…

स्टार क्रिकेटर्सचे योग्य खाते कसे ओळखायचे ते पाहा –

रोहित शर्मा (@ImRo45)
विराट कोहली (@imVkohli)
महेंद्रसिंग धोनी (@msdhoni)
सचिन तेंडुलकर (@sachin_rt)
ऋषभ पंत (@RishabhPant17)
युवराज सिंग (@YUVSTRONG12)
सूर्यकुमार यादव (@surya_14kumar)
श्रेयस अय्यर (@ShreyasIyer15)
रवींद्र जडेजा (@imjadeja)
अजिंक्य रहाणे (@ajinkyarahane88)
सौरव गांगुली (@SGanguly99)
इशांत शर्मा (@ImIshant)
क्रृणाल पांड्या (@krunalpandya24)
भुवनेश्वर कुमार (@BhuviOfficial)
मोहम्मद शमी (@MdShami11)

या परदेशी क्रिकेटपटूंच्याही ब्लू टिक्सही काढण्यात आल्या –

भारतीय क्रिकेटपटूंसोबतच अनेक परदेशी क्रिकेटपटूंच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक्स काढण्यात आल्या आहेत. पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक हटवण्यात आली आहे. त्याचबरोबर पाकिस्तान क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार बाबर आझम आणि सलामीवीर मोहम्मद रिझवान यांच्या ब्लू टिक्सही काढण्यात आल्या आहेत. इतर परदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, अॅरॉन फिंच, बेन स्टोक्स यांच्या ब्लू टिक्सही काढण्यात आल्या आहेत.

या क्रिकेटपटूंची ब्लू टिक अजूनही शाबूत –

अधिकत्तर क्रिकेटपटूंच्या अकाऊंटवरून ब्लू टिक्स हटवण्यात आल्या आहेत. परंतु ज्या क्रिकेटपटूंचे ब्ल्यू टिक्स काढले गेले नाहीत, त्यात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या, माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, हरभजन सिंग यांचा समावेश आहे.