LSG vs DC IPL 2022 : लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सला (DC) चांगली कामगिरी करता आली नाही. संपूर्ण २० षटकं खेळूनही दिल्लीला ३ बाद केवळ १४९ धावाच करता आल्या. दिल्लीकडे विकेट असूनही आक्रमक खेळ दाखवता आला नाही. त्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतही सावकाश खेळल्याने ट्विटरवर पंत ट्रोल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत अखेरपर्यंत मैदानावर पाय रोवून उभा राहिला. मात्र, त्याला वेगाने धावा करता आल्या नाही. पंतने ३६ चेंडूंचा सामना करत नाबाद ३९ धावा केल्या. दुसरीकडे पंतला साथ देणारा फलंदाज सरफराज खानने २८ चेंडूत नाबाद ३६ धावा केल्या. पंतकडून टी-२० सामन्यात इतकी संथ फलंदाजी कोणालाही अपेक्षित नव्हती. त्यामुळेच पंत ट्विटरवर जोरदार ट्रोल झालाय.

(“डेथ ओव्हरमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं नियोजन… खूपच छान”)

(“जेव्हा जेव्हा दिल्लीचा संघ हरतो, तेव्हा मला आनंद होतो”)

(ऋषभ पंत कसोटीत टी-२० आणि टी-२० मध्ये कसोटीसारखं खेळतो. काही लोक त्याला भारताचा कर्णधार बनवू पाहत आहेत. तो चेंडू न पाहताच मारतो.)

(दिल्लीचा संघ कायमच लूजर लोकांचा समूह राहिली आहे.)

(ऋषभ पंतची खराब कामगिरी)

(जर पंत पूर्ण ताकदीने खेळू शकला नाही, तर त्याने प्रशिक्षकाला दोष देणं बंद करावं.)

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ च्या हंगामातील १५ वा सामना मुंबईत डी वाय पाटील स्टेडियममध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळला गेला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीने २० षटकात ३ विकेट गमावून १४९ धावा करत लखनऊला १५० धावांचं लक्ष्य दिलं. लखनऊने ६ गडी राखून हे लक्ष्य प्राप्त केलं. यासह लखनऊ गुणतालिकेत ६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी ३४ चेंडूत ६१ धावांची दमदार अर्धशतकीय कामगिरी करून बाद झाला. वॉर्नरला मात्र १२ चेंडूत केवळ ४ धावाच करता आल्या. यानंतर ११ व्या षटकात दिल्लीला तिसरा झटका लागला. रवि बिश्नोईने रोवमॅन पॉवेलला बोल्ड आऊट केलं. पॉवेलने १० चेंडूत केवळ ३ धावा केल्या.

पॉवेलनंतर सरफराज खान मैदानात उतरला. यानंतर पंत आणि सरफराज अखेरपर्यंत खेळले. पंतने ३६ चेंडूत ३९ धावा केल्या, तर सरफराजने २८ चेंडूत ३६ धावा केल्या. दोघेही नाबाद राहिले. यासह दिल्लीने २० षटकात ३ विकेट गमावून १४९ धावा करत लखनऊला १५० धावांचं लक्ष्य दिलं.

लखनऊ सुपर जायंट्सची खेळी

लखनऊचा संघ १५० धावांच्या लक्षाचा पाठलाग करत मैदानात उतरला. सुरुवातीला लखनऊचा कर्णधार के. एल. राहुलने २५ चेंडूत २४ धावांची, तर क्विंटन डी कॉकने ५२ चेंडूत ८० धावांची खेळी केली. यानंतर एविन लुईस १३ चेंडूत केवळ ५ धावा काढून बाद झाला. दीपक हुड्डाला देखील १३ चेंडूत ११ धावाच करता आल्या. अखेरीस कृणाल पांड्या आणि आयुष बदोनीने सामना लखनऊच्या खिशात टाकला. पांड्याने १४ चेंडूत नाबाद १९ धावा, तर बदोनीने ३ चेंडूत नाबाद १० धावा केल्या.

लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) आतापर्यंत चार पैकी ३ सामने जिंकत दमदार प्रदर्शन केलंय. दुसरीकडे दिल्लीने आतापर्यंत ३ सामने खेळले असून त्यात दोन सामन्यात पराभव स्विकारला आहे.

हेही वाचा : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सचा फलंदाज मनिष पांडेला ड्रॉप करण्याबाबत मोठी प्रतिक्रिया

लखनऊ सुपर जायंट्स प्लेईंग ११ (Lucknow Super Giants)

के. एल. राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, एविन लुईस, दीपक हूडा, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, अँड्रू टाय, रवि बिश्नोई, आवेश खान

दिल्ली कॅपिटल्स प्लेईंग ११ (Delhi Capitals)

ऋषभ पंत (कर्णधार), पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, सरफराज खान, रॉवमॅन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मुस्ताफिजुर रहमान, एनरिक नॉर्टजे

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter users troll rishabh pant for his slow batting in ipl 2022 against lsg pbs