इंडियन प्रिमियरल लीग अर्थात आयपीएल २०२२ मध्ये पुन्हा एकदा करोनाचा शिरकाव झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे फिजओ पॅट्रिक फरहार्ट करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता याच संघाच्या ताफ्यातील आणखी दोघांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये एक परदेशी खेळाडू तर दुसरा सपोर्ट स्टाफचा सदस्य आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात आता एकूण तिघांना करोनाची लागण झाली आहे. ESPN क्रिक इन्फोने याबाबत अधिक माहिती दिली आहे.

हेही वाचा >>> IPL 2022 : तू क्रिकेटर आहेस ना?; सततच्या खराब खेळीनंतर गुजरात टायटन्सच्या खेळाडूवर भडकले चाहते

आयपीएलमध्ये करोनाचा पुन्हा एकदा शिकराव झालेला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओथेरेपिस्ट पॅट्रिक फरहार्ट करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दिल्लीचा पूर्ण संघच विलगीकरणात गेला आहे. तसेच फरहार्ट यांना करोनाची लागण झाल्यानंतर आता आणखी दोघांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. यामध्ये एक परदेशी खेळाडू असून दुसरा सपोर्ट स्टाफचा सदस्य असल्याची माहिती मिळतेय. दोन दिवसानंतर दिल्ली कॅपिट्लसचा सामना पुण्यात पंजाब किंग्जशी होणार आहे. त्याआधीच दिल्ली संघामध्ये करोनाचा झालेला शिकराव चिंतेचा विषय ठरत आहे. संघाने आपला पुण्याचा प्रवास तत्काळ रद्द केला असून सध्या दिल्लीचा पूर्ण संघ क्वॉरंटाईन आहे.

हेही वाचा >>> IPL 2022 : आयपीएलवर करोनाचे सावट; दिल्ली कॅपिटल्सच्या संपूर्ण संघाला करावे लागले क्वारंटाईन

बंगळुरु संघालाही सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा सल्ला

शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये सामना झाला. या सामन्याच्या दोन दिवसांआधीच फरहार्ट यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघासोबतच बंगळुरु संघालाही सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा सल्ला आयपीएलने दिलेला आहे. तसेच सामना संपल्यानंतर जेथे प्रशिक्षक आणि खेळाडू एकत्र येतात, तिथे गर्दी करण्याचे टाळावे, असेदेखील आयपीएलने दोन्ही संघांना सांगितले आहे.

हेही वाचा >>> IPL 2022 : युझवेंद्र-नटराजनकडे प्रत्येकी १२ विकेट; तरीही पर्पल कॅप चहलकडेच; जाणून घ्या कारण..

दरम्यान, सध्या करोनाचा संसर्ग कमी झालेला असला तरी सर्व खेळाडू बायोबबलमध्ये असून करोना प्रतिबंधक नियमांचे केले जात आहे. असे असले तरी आता दिल्ली कॅपिटल्स संघात करोनाचा शिरकाव झालेला आहे. मागील आयपीएलच्या हंगामात करोनाने शिकराव केल्यामुळे अर्धे सामने यूएईमध्ये घ्यावे लागले होते. त्यामुळे यावेळी खेळाडूंनी जास्त खबरदारी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.

Story img Loader