Fastest Ball in IPL : राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव झाला असला तरी त्यांचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने चाहत्यांच्या ह्रदयाचे ठोके वाढवले. मलिकने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच षटकात ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजी केली. यानंतर मलिकच्या गोलंदाजीच्या वेगाचं कौतुक करत चाहत्यांनी मलिक भारतीय वेगवान गोलंदाजीचं भविष्य असल्याचं म्हटलं. तसेच मलिक लवकरच आयपीएलमधील सर्वात वेगवान गोलंदाजी करेल अशी आशाही व्यक्त केली. सोशल मीडियावर अनेकांनी उमरान मलिकच्या पहिल्याच षटकातील ६ चेंडूंच्या वेगाची आकडेवारी शेअर करत मतं मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमरान मलिकने या सामन्यात एकूण ४ षटकं टाकली. यात त्याने ९.७५ च्या सरासरीने ३९ धावा देत २ विकेट घेतल्या. मलिकने बटलरची महत्त्वाची विकेट घेत त्याला ३५ धावांवर माघारी पाठवलं. यानंतर त्याने देवदत्तला ४१ धावांवर बाद केलं.

आयपीएलमधील सर्वात वेगवान गोलंदाजीचे विक्रम –

शॉन टेट – १५७.७१ किमी प्रति तास
अनरिच नॉर्तजे – १५६.२२ किमी प्रति तास
अनरिच नॉर्तजे – १५६.२१ किमी प्रति तास
अनरिच नॉर्तजे – १५४.७४ किमी प्रति तास
अनरिच नॉर्तजे – १५४.२१ किमी प्रति तास
डेल स्टेन – १५४.४ किमी प्रति तास
कगिसो रबाडा – १५४.२३ किमी प्रति तास

दरम्यान, यंदाच्या आयपीएल २०२२ च्या हंगामाचा पाचवा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्समध्ये झाला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा ६१ धावांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सने सनरायझर्सला २११ धावांचं लक्ष्य दिलं. मात्र, सनरायझर्सला २० षटकात ७ बाद केवळ १४९ धावाच करता आल्या. या विजयासह राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर गेला आहे.

हेही वाचा : IPL 2022, SRH vs RR : राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्सवर ६१ धावांनी दणदणीत विजय

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन :

केन विल्यमसन – कर्णधार, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मरक्रम, निकोलस पूरन, अब्दुल समद, रोमारिया शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक</p>

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन :

संजू सॅमसन – कर्णधार, जोस बटलर , यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्वीन, नाथन कोल्टर निल, प्रसिध क्रिष्णा, ट्रेंट बोल्ट, यजुवेंद्र चहल