आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २८ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी नेत्रदीपक कामगिरी केली. हैदराबादच्या गोलंदाजांनी जोराचा मारा केल्यामुळे पंजाबचे पूर्ण गडी बाद झाले. पंजाबला फक्त १५१ धावांपर्यंत मजल मारता आली. जम्मू-काश्मीरच्या उमरान मलिकने तर शेवटच्या षटकात तीन विकेट्स आणि एका गड्याला धावबाद केलं. शेवटच्या षटकात उमरानने ही कामगिरी केल्यामळे त्याच्या गोलंदाजीचे कौतुक केले जात आहे.

हेही वाचा >> मयंक अग्रवाल जखमी होताच पंजाब किंग्ज संघात मोठा बदल, शिखर धवनकडे कर्णधारपद

पंजाबच्या १५१ धावा असताना ओडेन स्मिथ आणि रबाडा मैदानावर फलंदाजी करत होते. मात्र शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या उमारन मलिकने पंजाबच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. १५१ धावा असताना उमरान मलिक याने एकापाठोपाठ तीन गड्यांना बाद केलं. तसेच उमरानच्याच चेंडूंवर एका गड्याला धावबाद करण्यात हैदराबादला यश आले.

हेही वाचा >> IPL 2022 : बाद होताच त्रागा! मुंबईच्या इशन किशनने भर मैदानात काढला राग, कारवाई होणार ?

पंजाबचा संघ १८० धावांपर्यंत मजल मारण्याचे अंदाज बांधले जात असताना उमरान मलिकच्या वेगवान गोलंदाजीपुढे पंजाबचे फलंदाज टिकू शकले नाहीत. ओडेन स्मिथ १३ धावांवर झेलबाद झाल्यानंतर उमरान मलिकने राहुल चहर, वैभव अरोरा यांना शून्यावर त्रिफळाचित केलं. तर अर्षदीप सिंग शून धावांवर असताना तो धावबाद झाला.

हेही वाचा >> आरसीबीच्या दिनेश कार्तिकचं मोठं स्वप्न, म्हणतो “भारताला टी-२० विश्वचषक…”

याआधी उमरान मलिकने जितेश शर्मालादेखील झेलबाद करुन तंबुत परत पाठवलं. त्यामुळे हैदराबादच्या उमरानने पंजाबचे एकूण चार गडी बाद केले. तर एका फलंदाजाला धावबाद करण्यात यश मिळवलं. पंजाब १५१ धावा करु शकला.

Story img Loader