Umran Malik Takes Abdul Samad Interview : राजस्थान रॉयल्सविरोधात अटीतटीचा सामना सुरु असताना अब्दुल समदने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला अन् सनरायझर्स हैद्राबादला दणदणीत विजय मिळवून दिला. मात्र, सामना संपल्यानंतर समदने त्याचा मित्र उमरान मलिकला मॅच फिनिशबाबत महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. तो उमरानला म्हणाला, मी चेंडूला फक्त माझ्या स्लॉटमध्ये पडण्याची प्रतिक्षा करत होतो. मला माहित होतं की, चेंडू माझ्या झोनमध्ये पडल्यावर मी मॅच फिनिश करेल. मी शॉट मारून धावा काढण्यासाठी खेळपट्टी सोडली होती. मला त्यावेळी वाटलं की, चेंडू सीमारेषेबाहेर जाईल, पण तसं झालं नाही. मात्र, मी अंपायरला पाहिल्यानंतर मला समजलं की, तो नो बॉल होता. तेव्हा मी जानेसनला म्हटलं, की दोन धावा काढायच्या आहेत. पंरतु, तोपर्यंत डेड बॉल जाहीर करण्यात आलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॅच फिनिश न केल्यामुळं नाराजी होती, कारण…

अब्दुलने पुढं बोलताना म्हटलं, “संघाने त्याला मॅच फिनिश करण्याची जबाबदारी दिली आहे. परंतु, या सीजनमध्ये जेव्हा संधी मिळाली त्यावेळी काही मॅच फिनिश करता आल्या नाही. यामुळे मी स्वत:वर खूप नाराज होतो. पण प्रत्येकवेळी मॅच फिनिश होऊ शकत नाही. पण यावेळी नशिबाने चेंडू माझ्या झोनमध्ये पडला आणि मला माहित होतं की मी या चेंडूवर मोठा फटका मारेल.”

नक्की वाचा – RR vs SRH: संदीप शर्माच्या नो बॉलवर कर्णधार संजू सॅमसनची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला, “तुम्ही रेषेच्या बाहेर…”

इथे पाहा व्हिडीओ

अब्दुल समद आणि उमरान मलिकच्या संवादाचा व्हिडीओ इंडियन प्रीमियर लीगच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत उमरान मस्ती करताना दिसत आहे. उमरानने म्हटलं की, त्याने ८-९ केक ऑर्डर केल्या आहेत. त्यामुळे समदसोबत काय होणार? याचा विचार करा. त्यानंतर समदने यावर मजेशीर प्रतिक्रिया देताना म्हटलं, मी हॉटेलमध्ये पोहोचल्यावर माझ्या रूममध्ये पळून जाईल, कारण सर्व उमरानसारखे वेडे आहेत.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Umran malik takes an interview of sunrisers hyderabad match winner player abdul samad watch video ipl 2023 nss
Show comments