इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या (IPL 2022) १५ व्या हंगामात चॅम्पियन राहिलेला मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झालाय. आता मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी उरलेला प्रत्येक सामना जिंकावा लागेल. इतकंच पुरेस होणार नाही तर इतर काही संघांचा पराभव देखील व्हावा लागेल, तरच मुंबईला प्लेऑफमध्ये जागा मिळेल. अशाप्रकारे मुंबईला यंदाच्या हंगामात बराच संघर्ष करावा लागतोय. अशातच मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरलाय. तसेच मुंबई इंडियन्सच्या नावावरही एक नकोसा विक्रम झालाय.

आयपीएल २०२२ मध्ये मुंबईचा सलग सातव्यांदा पराभव झालाय. या पराभवासह मुंबईच्या नावावर नकोसा विक्रम झाला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा देखील शेवटच्या सामन्यात खातं न उघडताच बाद झाला. त्यामुळे रोहित सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरलाय. रोहित शर्मा आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण १४ बार खातं न उघडताच बाद झालाय.

सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पीयूष चावलाआहे. पीयूष चावला आयपीएलमध्ये एकूण १३ वेळा शून्यावर बाद झालाय. मात्र, सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्यांमध्ये रोहित शर्मा एकमेव सलामीवीर फलंदाज आहे. याआधी हा नकोसा विक्रम लेग स्पिनर पीयूष चावलाच्या नावावर होता. यानंतर हरभजन सिंगचं नाव होतं.

या यादीत मनदीप सिंह आणि पार्थिव पटेलचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत पहिल्या ५ खेळाडूंच्या नावांवर १३ वेळा शून्यावर बाद होण्याची नोंद आहे. आता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध शून्यावर बाद झाल्यानंतर रोहित या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आणि त्याने नकोसा विक्रम स्वतःच्या नावावर केला.

दुसरीकडे मुंबई इंडियन्सने देखील आपल्या नावावर असाच एक नकोसा विक्रम केलाय. यंदाच्या आयपीएलच्या कोणत्याही हंगामात पहिल्या सात सामन्यात पराभूत झालेला मुंबई एकमेव संघ ठरलाय. आयपीएल २०१३ मध्ये दिल्ली डेअरडेविल्स (आताचा दिल्ली कॅपिटल्स) आणि आयपीएल २०१९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (आरसीबी) नावे सुरुवातीचे प्रत्येकी ६ सामन्यांमध्ये पराभूत झाल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा आयपीएल चषक जिंकणारा एखादा संघ सलग पहिले सात सामने हरलाय.

Story img Loader