Vaibhav Suryavanshi sold by RR 1.10 crore in IPL 2025 Mega Auction : आयपीएल २०२५ चा मेगा लिलाव संपला आहे. या लिलावात अनेक नवे चेहरे उदयास आले, त्यापैकी एक होता बिहारचा लाल वैभव सूर्यवंशी. १३ वर्षांचा वैभव आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण करोडपती ठरला आहे. त्याला राजस्थान रॉयल्सने १.१० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. विशेष म्हणजे लिलावात त्याच टीम्स वैभवसाठी लढताना दिसल्या, ज्यांनी त्याची ट्रायल घेतली होती. मात्र, अखेरीस राजस्थानने दिल्ली कॅपिटल्सला मागे टाकत आपल्या ताफ्यात सामील केले. आता प्रश्न असा आहे की, बीसीसीआयने वैभव सूर्यवंशी यांच्या हाडांची चाचणी का केली होती?

बीसीसीआयने वैभव सूर्यवंशीच्या हाडांची केली होती चाचणी –

१३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी हा उंच धष्टपुष्ट खेळाडू आहे. त्याची शरीरयष्टी धिप्पाड असल्याने वयाबद्दल प्रश्न निर्माण होत राहतात. २०२३ साली दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी २७ सप्टेंबर २०२३ पर्यंत १४ वर्षांचा होणार असल्याचे सांगितले होते, तेव्हा लोकांच्या मनात त्याच्या वयाबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. वयाचा हा संभ्रम दूर करण्यासाठी जेव्हा टीव्ही 9 हिंदीने त्याचे प्रशिक्षक मनीष ओझा यांच्याशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, बीसीसीआयने त्याच्या हाडांची चाचणी केली आहे.

IPL Auction Who is Vaibhav Suryavanshi 13 Year Old Batter Becomes Youngest Player in IPL 2025 Mega Auction 2025 List
IPL 2025 Auction: कोण आहे वैभव सूर्यवंशी? आयपीएल लिलावात उतरणार फक्त १३ वर्षांचा भारतीय खेळाडू, ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलंय जलद शतक
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Ajit Pawar Sabha Mohol, Ajit Pawar news,
अजित पवारांकडून करमाळ्यात आमदार संजय शिंदे यांचा प्रचार, महायुती धर्माला कोलदांडा
aitraaz movie seqwel
अक्षय कुमारच्या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘या’ सिनेमाचा येणार सिक्वेल, चित्रपटाला २० वर्षे पूर्ण होताच निर्मात्यांनी केली घोषणा
yogi Adityanath batenge to katenge
‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, योगी आदित्यनाथ यांची घोषणा
actor himansh kohli wedding photos out
बॉलीवूड अभिनेत्याने मंदिरात साधेपणाने केलं अरेंज मॅरेज; लग्नातील फोटो आले समोर
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल

वैभवचे प्रशिक्षक वयाबद्दल काय म्हणाले?

वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांच्या मते बीसीसीआयला खेळाडूच्या जन्म प्रमाणपत्रावरील वयाशी कोणताही संबंध नसतो. कारण बीसीसीआयकडून खेळाडूच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या जातात. ज्यामध्ये त्याच्या हाडांची चाचणी करून, त्याचे वय शोधते आणि त्याचे प्रमाणीकरण केले जाते. प्रशिक्षकाच्या म्हणण्यानुसार, वैभव ९ वर्षांचा असताना बीसीसीआयने त्याची हाडांची चाचणी केली होती. हाडांच्या तपासणीत त्याचे वय एक वर्ष अधिक म्हणजे १० वर्षे, २ महिने किंवा ४ महिन्यांच्या जवळपास होते. प्रशिक्षक पुढे म्हणाले की, वैभवने २०२३ च्या मुलाखतीत जे वय सांगितले होते, ते वय केवळ हाडांच्या चाचणीच्या आधारे दिले गेले असेल.

हेही वाचा – Vaibhav Suryavanshi IPL 2025 : १३ वर्षीय फलंदाजाने IPL मध्ये लिहिला नवा इतिहास, करोडपती होणारा ठरला सर्वात तरुण खेळाडू, कोणी लावली बोली?

u

मनीष ओझा वैभव सूर्यवंशीला तो साडेआठ वर्षांचा असल्यापासून प्रशिक्षण देत आहेत. त्याने पुढे सांगितले की, वैभवच्या शरीराची रचना अशी आहे की, तो त्याच्या वयापेक्षा थोडा मोठा दिसतो. पण त्याला जवळून पाहिल्यावर लक्षात येईल की, त्याला अजून मिशीही आलेली नाही. त्याच्या वयानुसार, वैभव सूर्यवंशी एका चांगल्या फ्रँचायझीत दाखल झाला आहे. जी फ्रँचायझी तरुण खेळाडूंना तयार करण्यावर भर देत आली आहे. संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग हे स्टार्स आहेत, जे राजस्थानकडून आयपीएल खेळून चमकले आहेत. आगामी काळात त्या यादीत वैभव सूर्यवंशी यांचेही नाव जोडले जाण्याची शक्यता आहे.