Vaibhav Suryavanshi bids Rs 1.10 crore by RR in IPL 2025 : आयपीएल 2025 मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी 13 वर्षीय फलंदाजाने इतिहास रचला आहे. बिहारचा फलंदाज वैभव सूर्यवंशी आयपीएल लिलावात विकला जाणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. या खेळाडूला विकत घेण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये स्पर्धा लागली होती, ज्यामध्ये अखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. राजस्थानने वैभव सूर्यवंशीसाठी 1.10 कोटी मोजत आपल्या ताफ्यात सामील केले.
वैभव 13 वर्षांचा असून तो भारताच्या अंडर-19 संघातून खेळला आहे. लिलावात विकल्या जाण्यापूर्वीच, वैभवने इतिहास रचला होता, जेव्हा तो आयपीएल लिलावात सहभागी होणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता. दिल्ली कॅपिटल्सने या तरुण स्टारसाठी पहिली बोली लावली, ज्याची मूळ किंमत 30 लाख रुपये होते. दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यासाठी 1 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली, पण शेवटी राजस्थानने बाजी मारली. वैभवला आता माजी भारतीय प्रशिक्षक आणि महान क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवण्याची संधी मिळणार आहे.
कोण आहे वैभव सूर्यवंशी?
वैभव सूर्यवंशी हा बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवासी आहे. वैभव सूर्यवंशीने याआधीच मैदानावर आपल्या असामान्य कामगिरीने इतिहास रचला आहे. 2023-24 रणजी ट्रॉफी हंगामात, त्याने वयाच्या 12 वर्षे आणि 284 दिवसांत मुंबईविरुद्ध पदार्पण केले आणि असे करणारा तो स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला. या कामगिरीसह त्याने सचिन तेंडुलकर-युवराज सिंग यांसारख्या महान क्रिकेटपटूंचे विक्रम मोडीत काढले. युवराजने वयाच्या 15 वर्षे 57 दिवसांत पदार्पण केले होते. महान सचिन तेंडुलकरनेही वयाच्या 15 वर्षे 230 दिवसांत पदार्पण केले होते.
हेही वाचा – IPL 2025 Auction : आयपीएल लिलावात ‘बिहारी बाबू’ मालामाल! मुकेश कुमार आणि आकाश दीपवर लागली करोडोंची बोली
u
नुकतेच झळकावले होते शतक –
वैभव सूर्यवंशीने अलीकडेच चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या युवा कसोटी मालिकेदरम्यान शानदार फलंदाजी करत अवघ्या 62 चेंडूत 104 धावा केल्या. वयाच्या 13 वर्षे आणि 188 दिवसांमध्ये, तो स्पर्धात्मक क्रिकेटच्या 170 वर्षांच्या इतिहासातील सर्वात तरुण शतकवीर ठरला. इतकंच नाही तर युवा स्तरावर एका भारतीयाने सर्वात वेगवान शतकाचा विक्रमही केला. त्याचे 58 चेंडूत स्फोटक शतक हे या स्तरावरील दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. इंग्लंडच्या मोईन अलीने 56 चेंडूत ही कामगिरी केली होती.
या वर्षी जानेवारीमध्ये, रणजी ट्रॉफी 2023-24 मध्ये मुंबई विरुद्ध 12 वर्षे आणि 284 दिवस वयात प्रथम श्रेणी पदार्पण करणारा तो चौथा सर्वात तरुण भारतीय ठरला. सूर्यवंशी कूचबिहार ट्रॉफीच्या 2023 हंगामात बिहारकडून खेळला आणि झारखंडविरुद्धच्या सामन्यात त्याने 128 चेंडूंत 22 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 151 धावा केल्या. त्याच सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने 76 धावा केल्या. सूर्यवंशी भारताच्या 19 वर्षांखालील अ, भारत 19 वर्षांखालील, इंग्लंड 19 वर्षांखालील आणि बांगलादेशाखालील 19 च्या चतुर्भुज मालिकेतही खेळला आहे. या स्पर्धेत त्याने 53, 74, 0, 41 आणि 0 असे स्कोअर केले.