IPL 2023, PBKS vs KKR Cricket Score Update : आयपीएलच्या १६ व्या हंगामाचा दुसरा सामना आज मोहालीत ब्रिंद्रा स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नीतीश राणाच्या नेतृत्वात कोलकाताचा संघ पंजाब किंग्जशी भिडण्यासाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान, मैदानात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जने २० षटकांत ५ विकेट्स गमावत १९१ धावा केल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजपक्षेनं ३२ चेंडूत ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. पण शिखर धवनला अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना कोलकाताच्या वरुण चक्रवर्तीने बाद केलं. शिखर २९ चेंडूत ४० धावांवर खेळत असताना वरुणने त्याचा त्रिफळा उडवला आणि पंजाबच्या कर्णधाराला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. वरुणने शिखरला क्लीन बोल्ड केलेला व्हिडीओ आयपीएलच्या ट्वीटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे.

नक्की वाचा – ‘हा’ खेळाडू बनेल भारतीय क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार, हार्दिक पांड्याचं मोठं विधान, पत्रकार परिषदेत म्हणाला…

पंजाब किंग्जसाठी सलामीला मैदानात उतरलेल्या प्रभसिमरन सिंगने सुरुवातीच्या षटकांमध्ये चौफेर फटकेबाजी केली. सिंगने दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १२ चेंडूत २३ धावांची खेळी केली. परंतु, टीम साऊदीने सिंगला २३ धावांवर असताना झेलबाद केलं आणि पंजाबला पहिला धक्का दिला. पण त्यानंतर भानुका राजपक्षेने आक्रमक खेळी करत पॉवर प्ले मध्ये पंजाबला ५० धावांपर्यंत पोहोचवलं. त्यानंतरही भानुकाने मोठे फटके मारत ३२ चेंडूत ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र, उमेश यादवच्या गोलंदाजीवर राजपक्षे ५० धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि जितेश शर्माने पंजाबची कमान सांभाळली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varun chakaravarthy clean bowled shikhar dhawan on 40 runs watch viral video of ipl 2023 pbks vs kkr match nss