Varun Chakravarthy, IPL 2023: जर एखाद्या संघाला शेवटच्या षटकात फक्त ९ धावांची गरज असेल आणि फिरकी गोलंदाज गोलंदाजी करणार असेल तर साहजिकच त्याच्या विजयाची शक्यता जास्त असेल. केकेआरविरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात हेच आव्हान होते शेवटच्या षटकात होते वाटले हैदराबाद सामना सहज जिंकणार पण निकाल वेगळा लागला. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या षटकात हैदराबाद संघाला केवळ ३ धावा करता आल्या आणि त्याचा परिणाम म्हणजे कोलकाताचा संघ ५ धावांनी पराभव झाला. वरुण चक्रवर्तीने कोलकात्याला हैदराबादविरुद्ध विजय मिळवून कसा दिला? फिरकीपटू असूनही त्याने फलंदाजांना कसे फसवले हे खुद्द त्याने त्याच्या तोंडून उघड केले. वरुण चक्रवर्ती याने गेल्या वर्षीच्या चुकीतून शिकून आपली हरवलेली गोलंदाजीची ताकद कशी परत मिळवली हे सांगितले.
वरुण चक्रवर्तीने सांगितले की, “गेल्या वर्षी तो ८५किमी/प्रती वेगाने गोलंदाजी करत होता. जे त्याच्या मते थोडे कमी होते. या हंगामात वरुण चक्रवर्तीने त्याच्या चेंडूंचा वेग वाढवला आणि आता त्याचा सरासरी वेग ९०किमी/प्रती आहे, म्हणजे सरासरी वेग ५ किमी वाढला. त्याने त्याचा वेग वाढवून संघाला मीच कसा सामन्याचा हिरो हे त्याने शेवटचे षटक टाकून दाखवून दिले.” सामना जिंकल्यानंतर वरुण चक्रवर्तीनेच हे सांगितले.
वरुण चक्रवर्तीने शेवटच्या षटकात कसे कोलकात्याला विजयी केले?
हैदराबादविरुद्ध शेवटच्या षटकात वरुण चक्रवर्तीने ज्या वेगाने गोलंदाजी केली ती खूपच कमाल आहे. वरुणने शेवटच्या षटकात १०० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने २ चेंडू टाकले. तर तीन चेंडूचा वेग ९३ किमी. तासापेक्षा जास्त होता. हे स्पष्ट आहे की वरुणने त्याच्या गोलंदाजीत वेगात बदल करत विविधता आणली, म्हणूनच फलंदाजांना त्याचा चेंडू समजण्यात अडचण आली. वरुण चक्रवर्तीने शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अब्दुल समदला त्याच्या याच गतीने झेलबाद केले आणि हा फलंदाज बाद झाल्यावर हैदराबादचा विजय निश्चित झाला.
वरुण चक्रवर्तीचे अप्रतिम काम
तसे पाहायला गेले तर वरुण चक्रवर्तीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शेवटच्या षटकातच चांगली गोलंदाजी केली असे नाही. त्याआधीच्या १६व्या आणि १८व्या षटकातही अतिशय कसून गोलंदाजी केली. वरुणने १६व्या षटकात ४ धावा दिल्या आणि १८व्या षटकात त्याने केवळ ५ धावा खर्च केल्या. ज्यावेळी हैदराबादचे फलंदाज मोठे फटके कोलकाताच्या इतर गोलंदाजांना मारत होते त्यावेळी चक्रवर्तीने १८ चेंडूत केवळ १२ धावा दिल्या. वरुण चक्रवर्ती हा आयपीएल इतिहासातील पहिला स्पिनर आहे ज्याने शेवटच्या षटकात १० पेक्षा कमी धावांचे रक्षण करून संघाला विजय मिळवून दिला.
वरुण पॉवरप्ले-डेथ ओव्हर्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे
वरुण चक्रवर्तीने पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्स दोन्ही स्पेलमध्ये अप्रतिम गोलंदाजी करतो. पॉवरप्लेमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट फक्त ८ धावा प्रति षटक आहे. त्याच वेळी, डेथ षटकामध्ये त्याचा इकॉनॉमी रेट केवळ ८.७६ आहे. डेथ ओव्हर्सच्या दृष्टीने हा एक शानदार आकडा आहे. हे स्पष्ट आहे की वरुण चक्रवर्ती हा वेगळ्या दर्जाचा खेळाडू आहे आणि कदाचित त्यामुळेच कोलकात्याचा संघ त्याला खूप महत्त्व देतो.