रविवावरच्या डबल हेडरमधील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादव मुंबई संघाचे नेतृत्व करत आहे. आज वानखेडे मैदानावर मुंबई विरुद्ध कोलकाता सामना सुरू आहे. मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. केकेआरसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या युवा व्यंकटेश अय्यरने दमदार शतक झळकावले. कोलकाताने प्रथम फलंदाजी करत व्यंकटेश अय्यरच्या शतकाच्या जोरावर १८५ धावा केल्या. विजयासाठी १८६ धावांचे आव्हान ठेवले आहे.

कोलकात्याची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मुंबई इंडियन्सच्या धारदार गोलंदाजीसमोर जिथे केकेआरचे इतर फलंदाज धावांसाठी झगडत होते. तर दुसरीकडे व्यंकटेश अय्यर एका बाजूने वेगळ्याच स्टाईलमध्ये दिसत होता. संघाला पहिला धक्का सलामीवीर नारायण जगदीशण रूपाने बसला. जगदीशण खाते न उघडता कॅमेरून ग्रीनचा बळी ठरला. यानंतर रहमानउल्ला गुरबाज (१२), कर्णधार नितीश राणा (०५) आणि शार्दुल ठाकूर (१३) यांच्या रूपाने संघाला काही अंतराने झटके बसले. मात्र त्यानंतर आलेल्या वेंकटेशने कोलकात्याच्या डावाला आकार दिला आणि संघाला १८५ धावांच्या आकड्यापर्यंत पोहोचवले.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ

गुडघ्याला दुखापत, धावताना त्रास आणि तरीही गोलंदाजांवर जोरदार बरसात करत त्याने धावा कुटल्या . कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज व्यंकटेश अय्यरने आयपीएलमधलं पहिलं शतक झळकावताना धडाकेबाज आणि स्फोटक खेळी केली. कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज व्यंकटेश अय्यरने शतकाचा टप्पा ओलांडला आहे. त्याने ४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. आतापर्यंत त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि ९ षटकार मारले आहेत.

अशाप्रकारे वेंकटेश अय्यर आयपीएल २०२३ च्या हंगामात शतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू हॅरी ब्रूकने मोसमातील पहिले शतक झळकावले. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सकडून शतक झळकावणारा व्यंकटेश अय्यर दुसरा खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्ससाठी ब्रेंडन मॅक्युलमने पहिले शतक झळकावले, पण आता व्यंकटेश अय्यर कोलकाता नाईट रायडर्ससाठी शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. तसेच आयपीएल २०२३ च्या हंगामात शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याला मेरिडीथने जानसेनकरवी झेलबाद केले. तो १०४ धावा करून बाद झाला.

Story img Loader