Venkatesh Prasad criticizes Lucknow via tweet: शनिवारी इंडियन प्रीमियर लीग २०२३ (आयपीएल २०२३) मध्ये, गुजरात टायटन्स (जीटी) ने कमी धावसंख्येच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) चा ७ धावांनी पराभव केला. लखनऊचा संघ एकेकाळी मजबूत स्थितीत होता. संघाच्या हातात ९ विकेट्स होत्या आणि त्यांना ३५ चेंडूत ३० धावांची गरज होती. यानंतर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यानंतर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ संघाला माजी खेळाडू गोलंदाज व्यंकटेश प्रसादने लक्ष्य केले.
व्यंकटेश प्रसाद हे केएल राहुलचे मोठे टीकाकार आहेत हे कोणापासून लपून राहिलेले नाही. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत केएल राहुल खराब फॉर्ममधून जात असताना माजी खेळाडूने त्याला लक्ष्य केले होते. गुजरातविरुद्ध लखनऊच्या पराभवानंतर हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. मात्र, यावेळी त्याने केएल राहुलचे नाव घेता निशाना साधला आहे.
काय म्हणाला व्यंकटेश प्रसाद?
व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विट केले, “जेव्हा ३५ चेंडूत ३० धावा आणि ९ विकेट्स हातात असतात, तेव्हा धावांचा पाठलाग करण्यासाठी स्फोटक फलंदाजी आवश्यक असते. २०२० मध्ये, पंजाबसोबत काही प्रसंगी असे घडले की ते सहज जिंकायला हवे होते तिथे हरले. गुजरातने शानदार गोलंदाजी. कर्णधार हार्दिकने हुशारी दाखवली, तर लखनऊ मूर्खपणा दाखवला.”
हेही वाचा – IPL 2023 MI Vs PBKS: पंजाबची सुरुवात खराब झाल्यानंतर कर्णधार सॅम करनचं वादळ आलं अन्….पाहा Video
शेवटच्या पाच षटकात ३० धावा झाल्या नाहीत –
गुजरात टायटन्सच्या १३५ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना लखनौ सुपर जायंट्स संघाने १५ षटकांत २ बाद १०६ धावा केल्या. संघाला विजयासाठी शेवटच्या ५ षटकात ३० धावांची गरज होती. म्हणजेच प्रत्येक चेंडूवर १ धाव आवश्यक होती. केएल राहुल ४५ चेंडूत ५८ तर निकोल्स पूरन क्रीजवर होता. यानंतर अखेरच्या पाच षटकांत संघाला ६ गडी गमावून केवळ २३ धावा करता आल्या. केएल राहुल ६१ चेंडूत ६८ धावा करून बाद झाला. मोहित शर्माने शेवटच्या षटकात १२ धावांचा शानदार पद्धतीने बचाव केला.