इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये, राजस्थान रॉयल्स संघ आसाममधील गुवाहाटी येथील बार्सपारा स्टेडियमवर आपले दोन होम सामने खेळणार आहे. आयपीएलच्या १६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच नॉर्थ ईस्टमध्येही आयपीएल सामना होणार आहे. ५ एप्रिल २०२३ रोजी, माजी चॅम्पियन राजस्थान रॉयल्स संघ, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली, येथे पंजाब किंग्जचे सामना होणार आहे. पंजाबचा संघ गुवाहाटीला पोहोचला आहे. दरम्यान, संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा एक मजेदार व्हिडिओही समोर आला आहे.

अर्शदीप सिंगने बिहू गाण्यावर नृत्य सादर केले

पंजाब किंग्स फ्रँचायझीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अर्शदीप सिंग बसमधून उतरल्यानंतर टीमचे स्वागत करण्यासाठी आलेल्या महिलांसोबत पारंपारिक शैलीत नाचतानाही दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
bride groom dance on Bollywood song Akelaa hai mister khilaadi miss khilaadi chaahiye
Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
Reshma Shinde Dance Video
Video : रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन जाऊबाईसह जबरदस्त डान्स! छत्तीसगढ़ी गाण्यावर धरला ठेका, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Action taken against dancer and twenty customers at Panchgani hotel satara news
पाचगणीत हॉटेलमध्ये नृत्यांगना आणि वीस ग्राहकांवर कारवाई
Zee Marathi Makar Sankrant Celebration dance video
Video : ‘झुकेगा नहीं साला…’, अल्लू अर्जुनच्या गाण्यावर डॅडी अन् बाई आजीचा जबरदस्त डान्स! दोघांच्या हटके स्टाइलने वेधलं लक्ष

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा डान्सचा व्हिडिओ गुवाहाटीमधील एका हॉटेलचा सांगितला जात आहे. जिथे पंजाबच्या खेळाडूंची बस थांबते आणि एक एक करून सर्व खेळाडू बसमधून उतरतात आणि आत जातात. दरम्यान, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने बिहू नृत्य सादर केले. व्हिडिओमध्ये तो बिहू डान्स करताना खूपच मस्त दिसत होता. चाहतेही या व्हिडिओचा आनंद घेत आहेत.

राजस्थान रॉयल्सने यावर मजेशीर कमेंट केली

विशेष म्हणजे अर्शदीप सिंगच्या या व्हिडिओवर राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीनेही एक कमेंट केली आहे. या व्हिडिओला उत्तर देताना राजस्थान रॉयल्सच्या वतीने असे लिहिले आहे की उद्यासाठी कोलॅब पोस्ट? त्याचबरोबर इतर चाहत्यांनीही या व्हिडिओवर आपली बाजू मांडली आहे. एका यूजरने लिहिले की, “डान्स केकेआरविरुद्ध ३ विकेट्स घेतल्यासारखा झाला आहे.” दुसरीकडे, युजरने लिहिले की. “राजस्थानला एकदा हरवाच.” आणखी एका युजरने असेही लिहिले की, “अरे सरदार, तुम्ही यावेळी कमाल दाखवली नाहीतर सकाळी तुमचा बिहू डान्स होईल.”

उभय संघांतील हा सामना गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे, राजस्थान रॉयल्सचे दुसरे होम ग्राउंड म्हणून घोषित करण्यात आले आहे. राजस्थानने आपल्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ७२ धावांनी विजय मिळवला होता. तर दुसरीकडे पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध ७ धावांनी विजय मिळवला होता. पंजासाठी बुधवारी (५ एप्रिल) राजस्थाविरुद्ध खेळताना एक गोलंदाज डोकेदुखी ठरू शकतो. फिरकीपटू युजवेंद्र चहल पंजाब किंग्जविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज आहे. त्याने या संघाविरुद्ध आतापर्यंत २८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच हंगामातील आपल्या सामन्यात ४ विकेट्स घेतल्या होत्या. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ड याचे प्रदर्शन देखील पहिल्या सामन्यात चांगले राहिले.

हेही वाचा: IPL 2023: राजस्थान विरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाब किंग्जला दुसरा मोठा धक्का, ‘हा’ डॅशिंग अष्टपैलू खेळाडू आयपीएल मधून बाहेर

दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन –

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयसवाल, जोस बटलर, देवदत्त पडिकल, संजू सॅमसन (कर्णधार / यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युजवेंद्र चहल.

पंजाब किंग्स: शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सिकंदर रजा, शाहरुख खान, सॅम करन, नाथन एलिस, हरप्रीत बरार, राहुल चाहर, अर्शदीप सिंह.

Story img Loader