रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी (२३ एप्रिल) राजस्थान रॉयल्सचा सात धावांनी पराभव करून आयपीएलमध्ये शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना, आरसीबीने २० षटकांत ९ बाद १८९ धावा केल्या, ज्यामध्ये फॅफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अनुक्रमे ६२ आणि ७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात देवदत्त पडिक्कलच्या ५२ धावांच्या शानदार खेळीनंतरही राजस्थान रॉयल्सचा संघ सहा षटकांत केवळ १८२ धावाच करू शकला.

सामन्यादरम्यान मोहम्मद सिराजचा संयम सुटला. तो त्याचा सहकारी महिपाल लोमरोरवर चिडला. सिराजने लोमराला शिवीगाळ केल्याचेही अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये लिहिले होते. मात्र, याची पुष्टी होऊ शकली नाही. दोन्ही खेळाडूंनी सामन्यानंतर आपले स्पोर्ट्समॅन दाखवले आणि चाहत्यांना सांगितले की त्यांच्यात सर्व काही ठीक आहे.

Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rajasthan Candidate Who Slapped sdm
‘थप्पड’ प्रकरणाने राजस्थानात तणाव; सरकारी कर्मचाऱ्यांचा संप; अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांना अटक, समर्थकांकडून जाळपोळ
Sunil Tingre notice, Supriya Sule, Sharad Pawar,
कल्याणीनगर अपघात प्रकरण : आमदार सुनील टिंगरे यांनी पाठविलेल्या नोटीशीत ‘यांची’ही नावे !
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…

सिराजला राग का आला?

वास्तविक, राजस्थानला शेवटच्या दोन षटकांत ३० धावा करायच्या होत्या. सिराजने १९व्या षटकात १३ धावा दिल्या. त्याच षटकात त्याच्या पाचव्या चेंडूवर ध्रुव जुरेलने षटकार ठोकला. सहाव्या चेंडूवर ज्युरेलने लाँग ऑनच्या दिशेने चेंडू मारला. सीमारेषेवर उभ्या असलेल्या लोमराकडे चेंडू गेला आणि त्याला थ्रो करण्यास थोडा विलंब झाला. यावर सिराजची जुरेलला रनआउट करण्याची संधी हुकली. त्यानंतर त्याला खूप राग आला आणि त्याने लोमरोरला शिवीगाळ केली.

सिराजने माफी मागितली

सामन्यानंतर आरसीबीने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सिराज लोमरोरची माफी मागताना दिसत आहे. सिराज म्हणाला, “महिपाल मला माफ कर. मी यापूर्वी दोनदा माफी मागितली आहे. मी मैदानाबाहेर सामन्यात काय झाले हे मनात ठेवत नाही. सामना संपल्यानंतर सर्व काही विसरून जातो. तू ही मनात काही ठेवू नकोस.” यावर प्रतिक्रिया देताना महिपाल लोमर म्हणाला, “ठीक आहे सिराज भाई. मोठ्या सामन्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टी घडत राहतात. मी नाही फारसे मनावर घेत.”

हेही वाचा: Sachin Tendulkar @50: विश्वचषक २००३ मध्ये सचिन तेंडुलकरने असे काय केले, ज्यामुळे हरभजन सिंग भडकला होता? जाणून घ्या

हा सामना आरसीबीने जिंकला

सामन्यात आरसीबीची सुरुवात खास नव्हती. कर्णधार कोहली गोल्डन डकवर बाद झाला. हे पाहता आरसीबीची धावसंख्या १२ धावांत दोन विकेट्स अशी होती. ट्रेंट बोल्टने सुरुवातीला दोन विकेट्स घेतल्या आणि आरसीबीला अडचणीत आणले. यानंतर फाफ डू प्लेसिस (६२) आणि ग्लेन मॅक्सवेल (७७) यांनी अर्धशतकी खेळी खेळली आणि तिसऱ्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर १५व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत ३ बाद १५६ धावा झाल्या होत्या. यानंतर संघाला शेवटच्या ३१ चेंडूत केवळ ३३ धावा करता आल्या त्यात त्यांनी ६ गडी गमावले. हा सामना जिंकण्यासाठी राजस्थानला १९० धावांची गरज होती. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्स संघ निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून १८२ धावाच करू शकला आणि सामना ७ धावांनी गमावला.