CSK vs GT Highlights Dhoni Video: आयपीएल २०२३ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला. आणि आता दहाव्यांदा धोनीच्या चेन्नईने आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. १७२ धावांचे लक्ष्य देताना सीएसकेची सुद्धा चांगलीच दमछाक झाली होती. पण पुढे गोलंदाजीच्या वेळी खेळपट्टीने सीएसकेची साथ दिली आणि फिरकीपटूंनी आपली जादू चालवून गुजरात टायटन्सचा पराभव केला. मधल्या षटकांमध्ये तर गुजरातला केवळ ४६ धावा घेत चार विकेट्स गमवाव्या लागल्या होत्या. शुबमन गिल आणि रशीद खान हे एकमेव फलंदाज सीएसकेच्या विरुद्ध त्यातल्या त्यात उत्तम कामगिरी करताना दिसले परंतु गतविजेत्या गुजरातला एकंदरीत उत्तम कामगिरी जमली नाहीच.
गुजरात विरुद्ध चेन्नईच्या कालच्यासामन्यांतील काही क्षण अत्यंत खास ठरले, क्रिकेटप्रेमींच्या म्हणण्यानुसार हेच ते बदल होते ज्यामुळे कालचा सामना पालटण्याची सुरुवात झाली. एमएस धोनीने हार्दिक पंड्याला आउटकरताना आयत्या वेळी केलेला एक बदल हा मास्टरस्ट्रोक ठरला. गोलंदाजी व फिल्डिंगमध्ये हा बदल करताना धोनीचा अंदाज इतका परफेक्ट ठरला की आता हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे.
धोनीने बदल करण्यापूर्वी पहिल्या पाच षटकांमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजांचा वापर केला. सहाव्या षटकात त्याने महेश थेक्षानाला मैदानात आणले. चौथ्या बॉलमध्ये, फिरकीपटूने डिलीव्हरी ऑफ आऊट केली ज्यामुळे बॅटरला स्क्वेअरसमोर मोईन अलीकडे कट करण्यासाठी फिरावे लागले. हार्दिक जेव्हा पिचवर होता तेव्हा धोनीने जडेजाला बॅकवर्ड स्क्वेअरमधून बोलावले आणि बॅकवर्ड पॉइंटवर उभे केले.
थेक्षानाने सुद्धा चौथ्या स्टंप लाइनवर गोलंदाजी केली. यावेळी हार्दिकने जागा मिळवण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यातच तो इनफिल्डवर गेला आणि शॉट मारताच चेंडू थेट जडेजाच्या होतपर्यंत पोहोचला. यामुळे ७ चेंडूत फक्त ८ धावांवर हार्दिकला माघारी परतावे लागेल.
VIDEO: हार्दिकला आउट करण्यासाठी धोनीचा मास्टरप्लॅन
हे ही वाचा<< “IPL Play Off ची आमची पात्रताच नव्हती” फाफ डू प्लेसिसची RCB वर तिखट शब्दात टीका; म्हणाला, “नशीब की..”
दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ मात्र विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही. अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी आणि सीएसकेचा बदला घेण्यासाठी त्यांच्याकडे आणखी एक अजून संधी असेल. क्वालिफायर 2 मध्ये LSG आणि MI यांच्यातील एलिमिनेटर सामन्यातील विजेत्याशी GT चा सामना होईल.