Nicholas Pooran Trolled Naveen Ul Haq: लखनऊ सुपर जायंट्सचा धडाकेबाज खेळाडू निकोलस पूरन याने मंगळवारी रात्री एकना स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध विजयात मोठी कामगिरी करून दाखवली. पण सामन्याच्या अगोदरच पूरनने मुंबईच्या खेळाडूंआधी आपल्याच संघातील नवीन उल हकची मस्करीत चांगलीच शाळा घेतली होती. लखनऊचा संघ स्टेडियमकडे जाताना बसमध्ये पूरनने नवीनला कोपरखळी मारून चांगलेच सुनावले. विराट कोहली- गौतम गंभीर व नवीन उल हक अजूनही सोशल मीडियावर जोरदार पेटलेला आहे आणि पूरनचा हा व्हिडीओ सुद्धा त्याच वादावर भाष्य करणारा आहे असे दिसतेय. पण नेमकं तो असं म्हणाला तरी काय? चला मग पाहूया…
विराट कोहली- गंभीर व नवीन उल हकचा वाद काय होता?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स या सामन्यात विराट कोहली व गौतम गंभीर आमने सामने आले होते. नवीन उल हकने सुद्धा यावेळी कोहलीशी पंगा घेतला होता ज्यावरून सोशल मीडियावर सोनंही खेळाडू व संघाच्या चाहत्यांमध्येही वाद झाला होता. हे भांडण इतके टोकाला गेले होते की बीसीसीआयने सुद्धा या तिघांवर अनुक्रमे १०० व ५० टक्के फीचा दंड आकाराला होता. नंतर दोन्ही संघांच्या मालकांच्या मध्यस्थीने हा दंड खेळाडूंना भरावा लागला नाही. हा वाद इथेच थांबला नाही तर नंतर प्रत्येकवेळी नवीन व विराट सामन्याच्या वेळी काही ना काही पोस्ट करून एकमेकांशी भिडत होते. विराट कोहली मुंबई विरुद्ध सामन्यात एक धाव करून बाद झाल्यावर नवीनने आंब्यांचा फोटो शेअर करून पुन्हा एकदा विराटला डिवचले होते.
निकोलस पूरनचा Video व्हायरल
निकोलस पूरनने याच मुद्द्यावर एक व्हिडीओ बनवत नवीनची फिरकी घेतली. त्याने व्हिडिओमध्ये म्हंटले की, तुम्हाला एक संधी देतो हा माणूस कोण आहे ते ओळखा.. असं म्हणत तो कॅमेरा नवीनकडे फिरवतो आणि हसत त्याला “मँगो गाय”(माणूस) असे म्हणतो.
हे ही वाचा<< गौतम गंभीरने ‘त्या’ कमेंटविरुद्ध मागितली २ कोटींची नुकसान भरपाई; मानहानीच्या खटल्यात म्हणाला, “हे पैसे मी…”
दरम्यान, नवीनने आयपीएल २०२३ मध्ये ६ गेम खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने प्रत्येकी १४ आणि ६.१२ च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने त्याने ७ विकेट घेतल्या आहेत.