Arjun Tendulkar abusing cameraman: आयपीएलच्या २५व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुंबईने १४ धावांनी विजय मिळवला. सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने २० षटकांत पाच गडी गमावून १९२ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ १९.५ षटकांत १७८ धावांत सर्वबाद झाला. या सामन्यात अर्जुनने तेंडुलकरने आपली छाप सोडली, पण त्याच्या एका व्हिडिओची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. ज्यामध्ये अर्जुनने कॅमेरामनला शिवीगाळ केल्याचे लोकांना वाटत आहे.
अर्जुनचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो मुंबईच्या इनिंगचा आहे. अर्जुन मग डगआउटमध्ये बसलेला दिसत आहे आणि कॅमेरामनने अचानक त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. यानंतर अर्जुन सहकारी खेळाडूला रागाने काहीतरी बोलताना दिसत आहे. लिप सिंकवरून अर्जुनने कॅमेरामनला शिवीगाळ केल्याचा अंदाज सोशल मीडिया यूजर्स लावत आहेत. एका युजरने कमेंट केली की, “मी अर्जुनला शिवीगाळ करताना पाहिलं.” दुसर्या यूजरने लिहिले की, “जेव्हा कॅमेरा अर्जुनवर गेला, तेव्हा तो मला जाणूनबुजून दाखवतो, असे म्हटले आहे का?”
एसआरएच आणि एमआय सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, हा सामना रोमांचक होता. हा सामना मुंबईने १४ धावांनी जिंकला. मुंबईने १९२/५ अशी मोठी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात एसआरएचा संघ १९.५ षटकात १७८ धावांवर आटोपला. शेवटच्या षटकात एसआरएचला विजयासाठी २० धावांची गरज होती, पण अर्जुनने शानदार गोलंदाजी केली. त्याने २०व्या षटकात फक्त ५ धावा खर्च करून भुवनेश्वर कुमारची शिकार केली. भुवी आऊट झालेला शेवटचा खेळाडू होता. त्याने ५ चेंडूत २ धावा केल्या. अर्जुनची आयपीएलमधील ही पहिली विकेट आहे. त्याने सामन्यात २.५ षटके टाकली आणि १८ धावा दिल्या.
हेही वाचा – IPL 2023 MI vs SRH: मुंबई इंडियन्सची हॅटट्रिक! हैदराबादवर १४ धावांनी रोमांचक विजय
१९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली होऊ शकली नाही. त्यांनी अवघ्या ११ धावांत पहिली विकेट गमावली. गेल्या सामन्यातील शतकवीर हॅरी ब्रूक ९ धावा करून बाद झाला. बेहरेनडॉर्फने त्याला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. लवकरच हैदराबादला आणखी एक धक्का बसला जेव्हा राहुल त्रिपाठी ७ धावा करून बेहरेनडॉर्फच्या चेंडूवर ईशान किशनकरवी झेलबाद झाला. अशा प्रकारे सातत्याने हैदराबादचे फलंदाज बाद होत राहिले, ज्यामुळे त्यांचा पराभव झाला.