Chris Gayle crying video goes viral: आयपीएलचा १६वा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. ४ वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे, तर दुसऱ्या तीन संघांमध्ये अंतिम फेरीसाठी लढत आहे. अशा परिस्थितीत स्पर्धेतून बाहेर पडलेल्या संघांचे चाहते अजूनही निराशेच्या सागरात बुडालेले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे आरसीबीचा माजी खेळाडू ख्रिस गेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरसीबीच्या पराभवामुळे गेल दु:खी –

आयपीएलच्या चालू हंगामात चांगली कामगिरी करूनही आरसीबी संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. प्रत्येक वेळी प्रमाणे या वेळीही संघाला चॅम्पियन बनवण्याची चाहत्यांची इच्छा अपूर्णच राहिली. आरसीबीचा माजी खेळाडू ख्रिस गेलही आरसीबी प्लेऑफमधून बाहेर पडल्याने खूप दु:खी आहे. त्याची एक रील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गेल आरसीबी बाहेर पडल्याने दुख; व्यक्त करताना दिसत आहे.

गुजरातने आरसीबीला बाहेर काढले –

दीपराज जाधव या नावाच्या हँडलवरून हे व्हायरल रील्स इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. रीलमध्ये ख्रिस गेल ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ चित्रपटातील एका गाण्यावर अभिनय करताना दिसत आहे. आरसीबीच्या शेवटच्या सामन्यावर रीलची थीम आहे. शेवटच्या सामन्यात आरसीबीला गुजरात टायटन्सकडून ६ विकेटने पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर आरसीबी स्पर्धेतून बाहेर पडला. जर आरसीबीने हा सामना जिंकला असता, तर त्याची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता खूप जास्त होती. त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि त्याच्यातील नेट रनरेटने प्लेऑफचा मार्ग निश्चित केला असता.

गेलने आरसीबीसोबत सात वर्षे घालवली आहेत –

ख्रिस गेललाही आरसीबी बाहेर जाण्याचे दुःख आहे. कारण गेलने आरसीबीसोबत बराच काळ घालवला आहे. आयपीएलमध्ये १४२ सामने खेळणारा ख्रिस गेल २०११ ते २०१७ या कालावधीत आरसीबीकडून खेळला. आयपीएलमध्ये जेव्हा जेव्हा स्फोटक खेळाडूंचा उल्लेख होतो, तेव्हा गेलचे नाव नक्कीच येते. गेलने आयपीएलमध्ये सुमारे ४० च्या सरासरीने आणि सुमारे १५० च्या स्ट्राइक रेटने ४९६५ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – CSK vs GT: ऋतुराज गायकवाडने घेतलेल्या झेलने निर्माण झाला गोंधळ, चाहते पंचांवर संतापले, पाहा VIDEO

आरसीबीला हरवणाऱ्या गुजरातला आणखी एक संधी –

आयपीएल २०२३ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला. या सामन्यात गुजरातने २० षटकात १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते, प्रत्युत्तरात गुजरातचा संघ १५७ धावांवर गारद झाला. त्याचबरोबर सीएसकेने धोनीच्या नेतृत्वाखाली १०व्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. या पराभवानंतर आरसीबीला हरवणाऱ्या गुजरातला फायनलमध्ये जाण्याची आणखी एक संधी आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of chris gayle crying as rcb failed to reach the playoffs went viral vbm