David Warner falls at Bhuvneshwar Kumar’s feet: आयपीएलच्या १६व्या हंगामातील ३४व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आले आहेत. हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यापूर्वीचा एक व्हिडिओ आयपीएलने शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये डेव्हिड वार्नरने भुवनेश्वर कुमारच्या पाया पडताना दिसत आहे.

आयपीएल २०२२ पर्यंत वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि डेव्हिड वार्नर हे दोघेही एका संघाचे प्रतिनिधित्व करत होते. ते दोघेही सनरायझर्स हैदराबाद संघासाठी खेळत होते. यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाने २०२३ हंगामाच्या लिलावापूर्वी त्याला मुक्त केले. पंरतु भुवनेश्वर कुमारला कायम ठेवले. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने वार्नरला खरेदी आपल्या संघाचा कर्णधार बनवले. परंतु दोघेही वेगवेगळ्या संघासाठी खेळत असले, तरी त्यांची मैत्री पूर्वीसारखीच आहे. या गोष्टीचा प्रत्यय म्हणजे आयपीएलने शेअर केलेला व्हिडिओ आहे.

two wheeler rider senior citizen injured due to Manja
पुणे : जीवघेण्या नायलाॅन मांजामुळे ज्येष्ठ नागरिकांसह तिघे जखमी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Nitish Reddy climbs Tirupati Temple stairs on knees After Stunning Test Debut & Century vs Australia
Nitish Reddy: नितीश रेड्डी गुडघ्यावर चढला तिरूपतीच्या पायऱ्या, ऑस्ट्रेलियातील शतकानंतर देवाचे असे मानले आभार; VIDEO व्हायरल
part of house collapse in Jogeshwari, house Jogeshwari,
जोगेश्वरीत घराचा भाग कोसळून पाच जण जखमी
bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती
धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार? अजित पवार-अमित शाह यांच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार? अजित पवार-अमित शाह यांच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
Maharashtra News : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करत आक्रोश मोर्चा, मनोज जरांगेही सहभागी
Loksatta anvyarth Lok Sabha Elections BJP Narendra Modi Chandrababu Naidu Telugu Desam Party
अन्वयार्थ: आहे ‘डबल इंजिन’ तरीही…

आयपीएलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि डेव्हिड वार्नर दिसत आहेत. या व्हिडिओत दिसत आहे की इशांत आणि भुवनेश्वर कुमार मैदानात गप्पा मारत उभा आहेत, तितक्यात डेव्हिड वार्नर धावत येऊन भुवनेश्वर कुमारच्या पाया पडतो. यानंतर भुवनेश्वर त्याला उठवतो आणि त्याची गळाभेट घेतो. त्यानंतर ते एकमेकांसोबत गप्पा मारु लागतात. या घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दोन्ही संघांनी चालू मोसमात चांगली कामगिरी केलेली नाही. सनरायझर्स हैदराबाद संघाने ६ सामन्यांपैकी केवळ २ सामने जिंकले आहेत आणि ४ गुणांसह गुणतालिकेत ९व्या क्रमांकावर आहे. दिल्लीची कामगिरीही अशीच आहे. दिल्ली संघाने चालू आयपीएलमध्ये ६ सामने खेळले असून त्यात सलग पाच पराभवानंतर विजय मिळवला आहे. त्याचे दोन गुण असून ते १०व्या स्थानावर आहेत.

हेही वाचा – Sachin Tendulkar 50th Birthday: सचिनसाठी ‘२४ तारीख’ आहे खूपच खास, लग्न ते अनेक मोठे विक्रम रचलेत याच दिवशी

सामन्याबद्दल बोलायचे, तर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकानंतर ५ बाद १०६ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये डेव्हिड वार्नरे २१, मिचेल मार्श २५ आणि सरफराज खानने १० धावांचे योगदान दिले. संध्या मनिष पांडे २४ आणि अक्षर पटेलने १९ धावांवर खेळत आहेत. त्याचबरोबर हैदराबादकडून गोलंदाजी करताना सुंदरने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. त्याचबरोबर नटराजन आणि भुवनेश्वर प्रत्येकी एक विकेट घेतली.

Story img Loader