Yashasvi Jaiswal direct throw video: आरसीबी आणि आरआर यांच्यातील आयपीएल २०२३ चा ३२ वा सामना बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीकडून विराट कोहलीच्या रूपाने पहिली विकेट पडल्यानंतरही चांगली सुरुवात पाहायला मिळाली. यामध्ये सलामीवीर फाफ डू प्लेसिसचे महत्त्वाचे योगदान होते. या सामन्यात डु प्लेसिसचा डाव धावबाद झाल्याने संपुष्टात आला. त्याला राजस्थानच्या यशस्वी जैस्वालने धावबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यशस्‍वीच्‍या डायरेक्ट थ्रोने डु प्लेसिस परतला तंबूत –

डू प्लेसिसने ३९ चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली. या सामन्यात डु प्लेसिसने आयपीएल २०२३ मधील ५ वे अर्धशतक झळकावले. त्याच्या धावबादबद्दल बोलायचे, तर १४ व्या षटकात डु प्लेसिसने त्याची विकेट गमावली. डू प्लेसिसचा धावबाद आणि यशस्वी जैस्वालच्या शानदार क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, १४व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर फाफ डू प्लेसिस कव्हर्सच्या दिशेने एक शॉट खेळला. तेथे उपस्थित असलेल्या यशस्वी जैस्वालने प्रथम बॉल शानदारपणे पकडला आणि बसलेल्या अवस्थेत तो नॉन-स्ट्रायकरच्या टोकावर फेकला. डु प्लेसिस त्याच्या अचूक थ्रोमुळे धावबाद झाला आणि त्याचा डाव संपला. राजस्थानचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा डावातील हे षटक करत होता.

डू प्लेसिसने आयपीएल २०२३ मध्ये ४०० धावांचा टप्पा पार केला –

महत्त्वाचे म्हणजे, आतापर्यंत फाफ डू प्लेसिस हा आयपीएल २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याचबरोबर त्याने या मोसमात ४०० धावांचा टप्पाही पार केला आहे. डु प्लेसिसने ७ डावात ५ अर्धशतकांच्या मदतीने ४०५ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IPL 2023 RCB vs RR: राजस्थानविरुद्ध ग्लेन मॅक्सवेलची वादळी खेळी; कोहली-डिव्हिलियर्सच्या ‘या’ खास क्लबमध्ये झाला सामील

आरसीबीने नऊ गड्यांच्या मोबदल्यात १८९ धावा केल्या –

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने नऊ गडी गमावून १८९ धावा केल्या. फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला आरसीबीकडून चांगली खेळी करता आली नाही. या दोघांशिवाय फक्त दिनेश कार्तिक (१६ धावा) दुहेरी आकडा गाठू शकला. प्लेसिसने ६२ आणि मॅक्सवेलने ७७धावा केल्या. राजस्थानकडून संदीप शर्मा आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचबरोबर अश्विन आणि चहलला प्रत्येकी एक विकेट मिळाली.