Gautam Gambhir Laughing Video Viral: लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर गौतम गंभीर नेहमीच गंभीर दिसतो. त्याचा रागही सर्वश्रुत आहे. कोणाचाही सामना करायला सुद्धा मागेपुढे न पाहणाऱ्या गौतम गंभीरने मोठ-मोठ्यांचीही बोलती बंद केली आहे. कर्णधार केएल राहुलने गुजरात टायटन्सविरुद्ध संथ खेळी खेळली, तेव्हा गंभीरचा रागाने लालबुंद झालेला चेहरा दिसला होता. या सामन्यात लखनौला ७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र, पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यातील गौतम गंभीरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

लखनऊ सुपर जायंट्सच्या फलंदाजाने प्रथम पंजाब किंग्जच्या गोलंदाजांची जबरदस्त धुलाई करताना २५७ धावांचा भला मोठा डोंगर उभारला. त्यानंतर गोलंदाजीतही संघाने आपला दबदबा कायम राखला. पंजाबच्या डावाच्या १८व्या षटकात जितेश शर्मा बाद होताच डगआऊटमध्ये उपस्थित असलेला गौतग गंभीर हसत हसत काही हातवारे करताना दिसला. हे दृश्य पाहून समालोचकही आश्चर्यचकित झाले आणि हसू लागले. गंभीरचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रियाही येत आहेत. काही चाहते गौतम गंभीरच्या हसण्याला आश्चर्य मानत आहेत.

karan arjun salman and shah rukh khan blockbuster movie re releases
‘मेरे करन अर्जुन आएंगे…’, ३० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ब्लॉकबस्टर चित्रपट! सलमान खानने जाहीर केली तारीख…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
NCP Sharad Pawar or NCP Ajit Pawar will fight in Vadgaon Sheri and Hadapsar constituencies in pune
शहरातील ‘या’ मतदारसंघात होणार ‘घड्याळ’ विरुद्ध ‘तुतारी’ लढत!
zee marathi laxmi niwas new promo
‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत झळकणार ‘ही’ जोडी! ‘त्या’ दोघांना तुम्ही ओळखलंत का? नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Diwali Jugaad Video how to clean diya in Diwali 2024 kitchen tips in marathi
गॅसवर दिवा ठेवताच कमाल झाली; दिवाळीआधी पणतीचा ‘हा’ VIDEO जरूर पाहा, दिवाळीत होईल मोठा फायदा
cid
CID सहा वर्षांनी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, धमाकेदार टीझर प्रदर्शित; मालिकेत कोण कोण दिसणार?
Mahesh Manjrekar Reaction on Adinath Kothare Paani Movie
“विषय लीलया पेलला”, ‘पाणी’ चित्रपटावर प्रतिक्रिया देताना महेश मांजरेकरांनी आदिनाथ कोठारेचं केलं कौतुक अन् आजकालच्या अभिनेत्रींना दिला सल्ला
Rohit Sharma Forget His way To The Ground Funny Video Goes Viral in IND vs NZ Bengaluru Test
IND vs NZ: हद्दच झाली! रोहित शर्मा चक्क मैदानावर जाण्याचा रस्ताच विसरला? बंगळुरू कसोटीतील Video होतोय व्हायरल

पंजाबच्या गोलंदाजांचा घेतला खरपूस समाचार –

सामन्याबद्दल बोलायचे, तर पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. लखनऊचा सलामीवीर काइल मायर्सने २४ चेंडूत ५४ धावा करताना पंजाबच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. मार्कस स्टॉइनिसने ४० चेंडूत ७२, निकोलस पूरनने १९ चेंडूत ४५ आणि आयुष बडोनीने २४ चेंडूत ४३ धावा केल्या. अशा प्रकारे लखनऊच्या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.

हेही वाचा – IPL 2023: अनिल कुंबळेची मोठी भविष्यावाणी; एमआय-आरसीबी नव्हे, तर ‘हे’ चार संघ प्लेऑफमध्ये पोहोचणार

या खेळीच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने २० षटकात ५ गडी गमावून २५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्ज संघ १९.५ षटकांत २०१ धावा करून सर्वबाद झाला. पंजाबकडून अथर्व तायडे (३६ चेंडूत ६६ धावा) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३६ चेंडूत ६६ धावांचे योगदान दिले. मात्र, तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. तसेच तीन सामन्यांनंतर संघात परतलेला कर्णधार शिखर धवन एक धावा काढून बाद झाला.