IPL 2023 Tickets Mismanagement Video Viral: आयपीएल २०२३ च्या हंगामातील फक्त दोन सामने बाकी आहेत. दोन्ही सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. यातील दुसरा क्वालिफायर आज (२६ मे) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार असून, २८ मे रोजी याच मैदानावर आयपीएलचा अंतिम सामनाही होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने आधीच अंतिम फेरी गाठली असून मुंबई आणि गुजरात यांच्यातील दुसऱ्या क्वालिफायरच्या निकालावर दुसरा संघ निश्चित होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील दुसऱ्या क्वालिफायरपूर्वी, एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की आयपीएल २०२३ च्या उर्वरित दोन सामन्यांबद्दल चाहते किती वेडे आहेत. एक तिकीट घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ते सर्व ठीक होते. पण, असे काही व्हिडीओ समोर आले आहेत, जे पाहून कोणीही घाबरून जाईल. कारण तिकीटासाठी अशी मारामारी झाली की लोक एकमेकांना चिरडायला लागले होते.

स्टेडियम व्यवस्थापनावर तिकीट गैरव्यवस्थापनाचा आरोपही चाहत्यांनी केला. परिस्थिती एवढी अनियंत्रित झाली की, पोलिसांना यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मैदानात उतरावे लागले. यादरम्यान धक्काबुक्की झाली आणि त्यामुळे अनेक जण खालीही पडले. वास्तविक, ज्यांनी क्वालिफायर दोन आणि फायनलसाठी ऑनलाइन तिकीट काढले होते. ते सर्व तिकीट घेण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले होते. काही वेळातच गर्दी इतकी वाढली की चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली.

हेही वाचा – IND vs AUS: डब्ल्यूटीसी फायनल जिंकणाऱ्या संघाचा प्रत्येक खेळाडू बनणार कोट्याधीश, जाणून घ्या बक्षिसाची रक्कम

विश्वचषकाच्या दृष्टीनेही बीसीसीआयसाठी ही धोकादायक स्थिती आहे. कारण या मैदानावर विश्वचषक फायनल आणि भारत-पाक सामना होण्याची शक्यता आहे.