Irfan Pathan and Sunil Gavaskar dancing on Natu-Natu song: राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटातील नाटू-नाटू गाणे जगभरात लोकप्रिय झाले आहे. ऑस्कर मिळाल्यापासून या गाण्याची लोकप्रियता गगनाला भिडली आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रीटी आणि क्रिकेटर्सपर्यंत नाटू-नाटूची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि सुनील गावसकर यांनाही नाटू-नाटू गाण्याची भुरळ पडली आहे. दोघांनी या गाण्यावर एकत्र डान्स केला, ज्याला खूप पसंत केले जात आहे. दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इरफानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो गावसकर सोबत नाचताना दिसत आहे. वास्तविक, हा व्हिडिओ आयपीएल २०२३ च्या उद्घाटन समारंभाचा आहे. या सोहळ्यात अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने नाटू-नाटू गाण्यावर डान्स केला होत, तेव्हा या दोन्ही माजी क्रिकेटपटूंनी नृत्य केले होते. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यापूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा – IPL 2023: बीसीसीआयने जारी केले फर्मान, गोलंदाजांना गाळावा लागणार दुप्पट घाम, जाणून घ्या काय आहे कारण?

इरफानने डान्स व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “कोणी चांगले केले. आम्ही (सुनील गावसकर आणि इरफान पठाण) की रश्मिका मंदान्नाने. इरफान आणि गावसकर आयपीएल २०२३ मध्ये कॉमेंट्री पॅनलचा भाग आहेत. गावसकर यांच्या उद्घाटन समारंभाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये ते कॉमेंट्री बॉक्समध्येच नाचू लागले होते.

त्याचबरोबर आयपीएल २०२३ स्पर्धेबद्दल बोलायचे, तर आयपीएलच्या १६व्या हंगामातील सातव्या सामन्यात गुजरात टायटन्स संघ दिल्ली कॅपिटल्ससमोर आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीला मोसमातील पहिल्या विजयाचे वेध लागले आहेत. गेल्या सामन्यात त्यांना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी गुजरातने पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला.

Story img Loader