Kyle Mayers six stuns LSG players: आयपीएल २०२३ मध्ये शुक्रवारी मोहाली येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनऊने पंजाबवर मोठा विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊने २५७ धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात सलामीला आलेल्या काइल मेयर्सने पंजाब किंग्जच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्याने २४ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकार खेचून २२५ च्या स्ट्राईक रेटने एकूण ५४ धावा करत वेगवान सुरुवात केली. यादरम्यान त्याने एकामागून एक गगनाला भिडणारे षटकार मारले, जे पाहून त्याचे संघ सहकारीही थक्क झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एलएसजी खेळाडूही झाले आश्चर्यचकित –

हे दृश्य लखनऊच्या डावातीस तिसऱ्या षटकात पाहायला मिळाले. पंजाब किंग्जचा गोलंदाज गुरनूर ब्रारने या षटकातील तिसरा चेंडू टाकताच, मेयर्सने आपले हात उघडले आणि मिड-विकेटवर गगनचुंबी षटकार मारला. हा षटकार इतका जबरदस्त होता की डगआऊटमध्ये बसलेले एलएसजीचे खेळाडूही चकित झाले. रवी बिश्नोई, जयदेव उनाडकट यांच्यासह संघाच्या सपोर्ट स्टाफची रिअॅक्शन व्हायरल झाली.

बडोनी, स्टोइनिस आणि पूरनची वादळी खेळी –

मेयर्सनंतर आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन आणि दीपक हुडा यांनी शानदार खेळी खेळली. बडोनीने २३ चेंडूंत ३ षटकार ३ चौकार मारून ४३ धावा केल्या, तर स्टोइनिसने ४० चेंडूंत ६ चौकार ५ षटकार मारत ७२ धावा केल्या. निकोलस पूरनने १९ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार मारत ४५ धावा केल्या. त्याचवेळी, दीपक हुडाने ११ आणि कृणाल पांड्याने ५ धावांचे योगदान देत संघाची धावसंख्या २५७ धावांपर्यंत पोहोचवली. आयपीएलच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आरसीबीच्या नावावर आहे, ज्याने २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध २६३ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – IPL 2023 PBKS vs LSG: लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का! ‘या’ स्टार खेळाडूला दुखापत झाल्याने वाढल्या अडचणी

या सामन्यात षटकार आणि चौकारांचा पाऊस पडला. २०१० मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एका आयपीएल सामन्यात सर्वाधिक षटकार आणि चौकार मारले गेले होते. या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी ६९ चौकार आणि षटकार लगावले होते. यानंतर २०१८ मध्ये पंजाब आणि कोलकाता यांच्यात झालेल्या सामन्यात ६७ षटकार आणि चौकार मारले गेले होते. यापूर्वी २००८ मध्ये डेक्कन चार्जर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात ६५ षटकार आणि चौकार मारले होते.

आयपीएल सामन्यात सर्वाधिक चौकार आणि षटकार –

६९ (३९, ३०) – चेन्नई विरुद्ध राजस्थान, चेन्नई, २०१०
६७ (४५, २२) – पंजाब विरुद्ध लखनौ, मोहाली, २०२३
६७ (३६, ३१) – पंजाब विरुद्ध कोलकाता, इंदूर, २०१८
६५ (४२, २३) – डेक्कन चार्जर्स विरुद्ध राजस्थान, हैदराबाद, २००८

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of lsg players stunned by kyle mayers towering six against punjab goes viral vbm