Matheesha Pathirana takes an amazing catch : आयपीएल २०२४ मधील १२ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात सलामीच्या जोडीने दिल्लीला शानदार सुरुवात करून दिली. या सामन्यात पृथ्वी शॉने दिल्ली संघात प्रवेश केला आणि डेव्हिड वॉर्नरसह पृथ्वी सलामीला फलंदाजीला आला होता. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने पुन्हा एकदा अप्रतिम खेळी केली. पण मथीशा पाथिरानाने हवेत उडी मारत वॉर्नरचा असा शानदार झेल घेतला की संपूर्ण स्टेडियम बघतच राहिले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पाथिरानाने कॅच घेत वॉर्नरचा डाव संपवला

या सामन्यात डेव्हिड वॉर्नर जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता आणि त्यानेही दिल्लीसाठी अप्रतिम खेळी खेळली. या सामन्यात डेव्हिडने ३५ चेंडूत ५२ धावांची खेळी खेळली. वॉर्नर ५२धावांवर फलंदाजी करत असताना त्याच्यासमोर मुस्तफिझूर गोलंदाजी करत होता. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने पाथीरानाच्या डोक्यावरून चौकार मारण्याचा प्रयत्न केला, पण पाथिरानाने हवेत उडी मारुन एका हाताने अप्रतिम झेल घेत वॉर्नरचा डाव संपवला. डेव्हिड वॉर्नरने आपल्या खेळीत ५चौकार आणि ३ शानदार षटकार मारले.

Story img Loader