Mohammad Siraj and Phil Salt Argument: शनिवारी रात्री आयपीएलमध्ये २०२३ च्या ५०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने आले होते. या सामन्यात दिल्लीने बंगळुरूचा ७ विकेट्सने पराभव केला. परंतु या सामन्यात मोहम्मद सिराज आणि फिल सॉल्ट यांच्यात जोरदार वादावादी झाली. येथे डेव्हिड वॉर्नर आणि अंपायरला हस्तक्षेप करावा लागला. मात्र, सामन्यानंतर नेमके उलटे चित्र समोर आले. दोन्ही संघातील खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या हस्तांदोलनाच्या वेळी सिराज आणि सॉल्ट मिठी मारताना दिसले. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मोहम्मद सिराज दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर फिल सॉल्टवर भडकला. कारण जेव्हा सॉल्टने सलग तीन चेंडूत षटकार आणि चौकार मारले. दिल्ली कॅपिटल्स १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद सिराज आरसीबीसाठी पाचवे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या पहिल्याच चेंडूवर सॉल्टने षटकार ठोकला. यानंतर दुसऱ्या चेंडूवरही सॉल्टने सिराजला कव्हरवर षटकार ठोकला. सॉल्ट इथेच थांबला नाही, त्याने सिराजच्या तिसऱ्या चेंडूवर अप्रतिम चौकार मारला. त्यामुळे सिराजला राग आला आणि तो सॉल्टकडे गेला आणि काहीतरी बोलू लागला.

आयपीएलच्या या हंगामात पॉवरप्लेमध्ये मोहम्मद सिराजची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. दिल्लीविरुद्धच्या लढतीपूर्वी त्याने या मोसमात पॉवरप्लेमध्ये ६ पेक्षा कमी इकॉनॉमी रेटने धावा दिल्या होत्या. अशा स्थितीत सिराजला एका पाठोपाठ षटकार-चौकार मारल्यावर त्याचा संयम सुटला. तो सुरुवातीला फिल सॉल्टकडे पाहून हसताना हसताना दिसला. मात्र, नंतर तो भडकलेला दिसत होता.

या सामन्यात फिल सॉल्टने ४५ चेंडूत ८७ धावांची खेळी केली. या वेगवान खेळीमुळे दिल्लीने २० चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. यानंतर क्रिकेट चाहत्यांनीही सिराजला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले. मात्र, सामन्यानंतर सिराजने सॉल्टला मिठी मारली तेव्हा क्रिकेट चाहत्यांनीही त्याचे कौतुक केले.

हेही वाचा – Saachi Marwah: नितीश राणाच्या पत्नीशी गैरवर्तन करणाऱ्या दोघांना अटक; जाणून घ्या काय आहे प्रकरण

सामन्याबद्दल बोलायचे तर, आयपीएलच्या ५० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध विजय मिळवला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर डीसीने आरसीबीचा सात विकेट्स राखून पराभव केला. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूने २० षटकांत ४ गडी गमावून १८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने १६.४ षटकांत तीन विकेट गमावत १८७ धावा करून सामना जिंकला.