MS Dhoni getting angry with Matheesha Pathirana: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. तो मैदानावर नेहमी शांत असतो आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करतो. धोनी हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि फिनिशर मानला जातो आणि तो युवा खेळाडूंना संधी देण्यास चुकत नाही. धोनीला राग आल्याचे क्वचितच पाहायला मिळत असले, तरी जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात धोनीला त्याच्या रागावर नियंत्रण ठेवता आले नाही. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पथिरानाने चेंडू मध्यभागी रोखला –
खरे तर असे झाले की राजस्थान रॉयल्सच्या डावाच्या १६ व्या षटकात, सीएसकेचा गोलंदाज मथीशा पथिरानाने षटकाचा तिसरा चेंडू टाकला तो हेटमायरच्या पॅडला लागला आणि मागे गेला. स्टंपच्या मागे उभा असलेला यष्टीरक्षक धोनी धावत गेला आणि त्याने लगेच चेंडू उचलून नॉन-स्ट्रायकरच्या टोकाकडे फेकला. यादरम्यान मध्यभागी उभ्या असलेल्या पथिरानाला काय करावे हे सुचले नाही आणि त्याने गोलंदाजांच्या टोकाकडे चाललेला चेंडू मध्येच अडवला.
धोनीला धावबादची संधी साधायची होती –
धोनीला नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला डायरेक्ट थ्रो मारून हेटमायरला धावबाद करण्याची संधी साधायची होती, पण पथिरानाने मध्यभागी चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला आणि संधी हुकली. मग काय त्यानंतर कॅप्टन कूल संतापला आणि पथिरानावर ओरडताना दिसला. यानंतर धोनीला ओरडताना पाहून पथिराना हसू आले. हे दृश्य पाहून कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले समालोचकही हसले. ते म्हणाले, पथिराणा आता धोनीला सॉरी सर म्हणेल.
हेही वाचा – Washington Sundar: सनरायझर्स हैदराबाद संघाचा निरोप घेताना वॉशिंग्टन झाला भावूक, एसआरएचने शेअर केला VIDEO
राजस्थानने चेन्नईचा ३२ धावांनी पराभव केला –
आयपीएल २०२३ च्या ३७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ३२ धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत ५ गडी गमावून २०२ धावा केल्या. ज्यामध्ये यशस्वी जैस्वालने ४३ चेंडूत ७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईचा संघ २० षटकांत ६ गडी गमावून १७० धावाच करू शकला. शिवम दुबेने ३३ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याचवेळी ऋतुराज गायकवाडने २९ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. आयपीएलमधील हा राजस्थानचा २०० वा सामना होता आणि त्यांनी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा २००हून अधिक धावा केल्या. त्यानंतर मोठा विजयही मिळवला.