CSK vs GT Qualifier Match Updates: एमएस धोनी हा एक चाणाक्ष कर्णधार म्हणून ओळखला जातो. जो सामन्यादरम्यान योग्य रणनीती, योग्य समन्वय आणि योग्य प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरतो. धोनीची रणनीती नेहमीच यशस्वी ठरली आहे. एवढेच नाही तर धोनी सामन्यादरम्यान योग्य निर्णय घेण्यासाठी देखील ओळखला जातो. यामुळेच धोनीला आयसीसीने ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड ऑफ द डिकेड’ हा किताबही दिला आहे. आता आयपीएल २०२३ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये धोनीने असे काही केले आहे की, ज्यामुळे चाहत्यांना अभिमान वाटत आहे.

खरं तर, गुजरात विरुद्धच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात सीएसकेने १५ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे चेन्नई संघ १०व्यांदा आयपीएल फायनलमध्ये पोहोचला आहे. या सामन्यादरम्यान गोलंदाज दीपक चहरने फलंदाज विजय शंकरला ‘माकंडिंग’ करून धावबाद करण्याचा प्रयत्न केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
Suresh Dhas
Suresh Dhas : …अन् भरसभेत सुरेश धसांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…
N Jagadeesan smashed 6 fours off 6 balls against Aman Shekhawat during RAJ vs TN match Vijay Hazare Trophy
N Jagadeesan : ६ चेंडू, ६ चौकार… एन.जगदीशनचा अनोखा विक्रम, VIDEO होतोय व्हायरल
Varun Chakravarthy dominates Vijay Hazare Trophy for Champions Trophy 2025 Squad spot in Team India
Varun Chakaravarthy : केकेआरच्या फिरकीपटूचा टीम इंडियात प्रवेशासाठी दमदार दावा; राजस्थानचा निम्मा संघ धाडला माघारी

गुजरातच्या डावातील १४व्या षटकातील पहिल्या चेंडूवर दीपकने फलंदाज विजयला घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्याने गोलंदाजी करताना अचानक थांबून ‘मांकडिंग’ करण्याचा प्रयत्न केला, शंकर त्यावेळी क्रीजमध्ये असतानाही दीपकने हे जाणूनबुजून केले.

दुसरीकडे दीपकचे हे कृत्य पाहून फलंदाजालाही धक्का बसला, पण आपल्या गोलंदाजाची ही हुशारी पाहून धोनीने ज्या प्रकारची प्रतिक्रिया दिली, त्याने चाहत्यांची मने जिंकली. वास्तविक, दीपकने असे कृत्य केल्याचे पाहून कर्णधार धोनी हसायला लागला. विशेष म्हणजे धोनी हसताना डोके हलवताना दिसला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.धोनीचे हावभाव पाहून असे वाटले की माही अशा प्रकारे फलंदाजाला बाद करण्याच्या विरोधात आहे. अलीकडच्या काळात माजी क्रिकेटपटू ‘मांकडिंग’ संदर्भात अनेक प्रकारचे वादविवाद करत आहेत. परंतु धोनीने यावर कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

हेही वाचा – Devon Thomas: वेस्ट इंडिजच्या खेळाडूवर मॅच फिक्सिंगचा गंभीर आरोप, आयसीसीने १४ दिवसांत मागवले उत्तर

सामन्याबद्दल बोलायचे, तर चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी करत १०व्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. चार वेळचा चॅम्पियन चेन्नई संघाने शानदार पुनरागमन केले आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकात ७ गडी गमावून १७२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सला सर्वबाद १५७ धावाच करता आल्या. गेल्या मोसमात ते प्लेऑफमध्येही पोहोचले नव्हते. धोनीच्या नेतृत्वाखाली संघ आता २८ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाचव्यांदा चॅम्पियन बनण्यासाठी उतरेल.

Story img Loader