Virat Kohli and Avesh Khan Funny Video Viral : आयपीाएल २०२४ मध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यात दोन अर्धशतके झळकावली आहेत. आता तो राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या हंगामातील १९व्या सामन्यात खेळताना दिसणार आहे. याआधी त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज आवेश खानसोबत मस्ती करताना दिसत आहे. सामन्यांची नाणेफेक जिंकून आरआरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

आरसीबी संघाने ६ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मैदानावर पोहोचून तयारी सुरू केली होती. सराव सत्रादरम्यान, कोहलीने आवेशशी विनोदी पद्धतीने भेट घेतली, ज्याचा व्हिडिओ राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कोहली आवेशला म्हणतो, ‘ये, ये उम्म्म्म… अशी संधी पुन्हा कुठे मिळणार आहे.’ यानंतर दोन्ही क्रिकेटपटूंनी मिठी मारली. विराट कोहलीने अशा हटक्या शैलीत आवेश खानची भेट घेतल्याने चाहत्यांना मागील हंगामातील एका सामन्याची आठवण झाली. जेव्हा आवेशने लखनऊकडून खेळताना आरसीबीविरुद्ध विजय मिळवल्यानंतर हेल्मेट जमिनीवर आपटले होते.

IND vs AUS virat Kohli Is Emotional Said Glenn MacGrath Urges Australia to Go Hard on Him in Border Gavaskar Trophy
IND vs AUS: “विराट कोहली भावनिक आहे, त्याचा फायदा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने कांगारू संघाला दिला मोलाचा सल्ला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा

विजयानंतर जमिनीवर आपटले होते हेल्मेट –

वास्तविक, आवेश आणि कोहली दोघेही आयपीएल २०२३ मध्ये आरसीबी आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या दोन सामन्यांदरम्यान प्रकाशझोतात आले होते. आरसीबी आणि एलएसजी यांच्यातील पहिला सामना रोमांचक होता, ज्यामध्ये केएल राहुलच्या संघाने बाजी मारली. या सामन्यात आरसीबीविरुद्ध धावांचे आव्हान पूर्ण करताना क्रीजवर असलेला लखनऊचा खेळाडू आवेश खान याने विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आपले हेल्मेट जमिनीवर फेकले होते. यानंतर आवेशला त्याच्या या कृतीसाठी मोठा दंड भरावा लागला.

हेही वाचा – SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

राजस्थान विजयाच्या रथावर स्वार –

आयपीएल २०२४ बद्दल बोलायचे झाले, तर संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्स विजयाच्या रथावर स्वार आहे. संघाने आतापर्यंत ३ सामने खेळले असून तिन्ही सामने जिंकले आहेत. राजस्थानचा संघ पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत राजस्थानवर मात करणे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी सोपे जाणार नाही. आरसीबीबद्दल बोलायचे झाले तर, संघाने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, ज्यात फक्त एक जिंकला आहे. या सामन्यात विराट कोहलीकडून चाहत्यांना आणि व्यवस्थापनालाही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरे, शिमरन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युजवेंद्र चहल.

हेही वाचा – IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: विराट कोहली. फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सौरव चौहान, रिन टोपली, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.