Sanju Sacrificed Half Century For Yashasvi’s Century: आयपीएल २०२३ चा ५६ वा सामना केकेआर आणि आरआर यांच्यात खेळला गेला. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ९ गडी राखून पराभव केला. सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या वेगवान फलंदाजीच्या जोरावर राजस्थानने १४ षटकं संपण्यापूर्वी सामना जिंकला. मात्र या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने आपल्या एक कृतीने सर्वांची मने जिंकली. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वास्तविक, राजस्थानने कोलकात्याचे १५० धावांचे लक्ष्य केवळ १३.१ षटकांत पूर्ण केले. या सामन्यादरम्यान एक दृश्य असे पाहिला मिळाले, जेव्हा कर्णधार संजू सॅमसन यशस्वी जैस्वालला शतक पूर्ण करण्यासाठी पूर्ण पाठिंबा देताना दिसला. १३व्या षटकात, जेव्हा आरआरला विजयासाठी फक्त तीन धावांची गरज होती, तेव्हा केकेआरचा फिरकीपटू सुयश शर्माने लेगस्टंपच्या बाहेर चेंडूला टाकला, परंतु संजू सॅमसनने त्याच्या बॅटने त्याचा बचाव केला. त्यानंतर जैस्वालला पुढच्या चेंडूवर षटकार मारण्याचे संकेत दिले.
स्ट्राईक बदलताना संजू बोलायला गेला आणि इथेही त्याने आरामात षटकार मारून शतक पूर्ण करायला सांगितले. मात्र १४वे षटक टाकण्यासाठी आलेल्या शार्दुल ठाकूरला जैस्वालला एक चौकार मारता आला आणि त्याबरोबरच सामना संपुष्टात आला. यानंतर संजू सॅमसनने दिलदारपणा दाखवला आणि यशस्वी जैस्वालला मिठी मारले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या सामन्यात रॉयल्सकडून यशस्वी जयस्वालने ९८ आणि कर्णधार संजू सॅमसनने ४८ धावांची नाबाद खेळी केली. यशस्वी जैस्वालच्या या इनिंगचे सर्वत्र कौतुक होत आहे. याशिवाय आरआरबद्दल बोलायचे झाले तर, आयपीएलमध्ये चांगली सुरुवात केल्यानंतर या स्पर्धेत गडबडलेल्या राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा टॉप ४ शर्यतीत परतण्याचा उत्साह दाखवला आहे. पुन्हा एकदा ते प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.